घरमहाराष्ट्रशिवाजी पार्कवर दसरा मेळावा होणार का? शिवसेनेच्या याचिकेवर हायकोर्टात आज सुुनावणी

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा होणार का? शिवसेनेच्या याचिकेवर हायकोर्टात आज सुुनावणी

Subscribe

मुंबई – महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात पोहोचलेला असताना राज्यातील आणखी एक संघर्ष उच्च न्यायालयात दाखल आहे. दसरा मेळाव्यावरून सुरू असलेली खडाजंगी मुंबई उच्च न्यायालयात पोहोचली असून शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे आजच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष आहे.

हेही वाचा – उद्धव ठाकरे खोटारडे अन् लबाड लांडगा; नारायण राणेंचे जोरदार टीकास्त्र

- Advertisement -

दादरच्या शिवाजी पार्कवर शिवसेनेकडून दसरा मेळावा आयोजित करण्याची जुनी परंपरा आहे. शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांनी ही परंपरा सुरू केली. त्यांच्या पश्चातही उद्धव ठाकरे यांनी ही परंपरा सुरू ठेवली आहे. दसरा मेळाव्यातील भाषणाकडे सामान्य नागरिकांसह राजकीय नेत्यांपर्यंत सर्वांच लक्ष असतं. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी २२ ऑगस्ट शिवसेनेच्या वतीने अनिल परब यांनी मुंबई पालिकेच्या जी-उत्तर विभागात केली होती. मात्र, लागलीच ३० ऑगस्ट रोजी एकनाथ शिंदे गटातून सदा सरवणकर यांनीही शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी पालिकेला अर्ज केला होता. मात्र, मुंबई पालिकेने कायदा-सुव्यवस्थेच्या कारणास्तव दोन्ही गटांना परवानगी नाकरली.

दरम्यान, शिवाजी पार्कवर आपल्याला परवानगी मिळणार नाही, अशी कुणकुण शिवसेनेला आधीच लागली होती. त्यामुळे त्यांनी दोन दिवसांपूर्वीच मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली होती. तसंच, मुंबई पालिकेने काल परवानगी नाकारल्यावर शिंदे गटाकडूनही मध्यस्थी याचिका दाखल करण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – रक्षाबंधनसारख्या पवित्र नात्याचे कुणीही राजकारण करू नये; भावना गवळींचा उद्धव ठाकरेंना टोला

शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीसाठी शिवसेनेने सर्व कागदपत्रे कोर्टाला सादर केली असल्याची माहिती शिवसेनेचे माजी मंत्री अनिल परब यांनी दिली. त्यामुळे आजच्या सुनावणीत काय होतंय, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याकरता दोन्ही गटाकडून रस्सीखेच सुरू आहे. दोन्ही गटांसाठी हा मुद्दा प्रतिष्ठेचा बनला आहे. सेनेत फूट पडल्यानंतर शिवसेनेच्या गटनेते मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर बाण सोडले होते. गोरेगाव येथील नेस्को मैदानातील त्यांचा सभा प्रचंड गाजली. त्यामुळे आता सर्वांचं लक्ष दसरा मेळाव्यातील भाषणाकडे आहे. आगामी निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे काय रणनीती आखतात हे या मेळाव्यातून स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – शिवतीर्थसाठी शिंदे गट आग्रही, मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली मध्यस्थ याचिका

शिंदे गटाला बीकेसी मैदानावर परवानगी

शिंदे गटाने शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याकरता परवानगी मागितली असताना बीकेसीच्या मैदानासाठीही एकनाथ शिंदे यांनी परवानगीचा अर्ज केला होता. त्यांचा हा अर्ज एमएमआरडीएने स्विकारला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेता येणार नसले तरीही ते बीकेसीच्या मैदनावर मेळावा घेऊ शकतात. दुसरीकडे मात्र, बीकेसीच्या दुसऱ्या मैदानावर शिवसेनेला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे  उद्धव ठाकरे यांची कोंडी झाली असून मुंबई उच्च न्यायालयातही निकाल नाही लागला तर उद्धव ठाकरे आणि शिवसेना काय भूमिका घेईल हे पाहावं लागेल.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -