घरताज्या घडामोडीउद्धव सरकार बरखास्त होणार? महाराष्ट्राच्या राजकारणातील आजच्या मोठ्या 10 घडामोडी, वाचा सविस्तर

उद्धव सरकार बरखास्त होणार? महाराष्ट्राच्या राजकारणातील आजच्या मोठ्या 10 घडामोडी, वाचा सविस्तर

Subscribe

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्वच नेत्यांची झोप उडवली आहे. शिंदेंच्या गटात ४० नेते असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात वेगाने हालचाली घडत आहेत. पुढील काही तासांत काय घडणार याकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, कालपासून राज्यात बऱ्याच मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. आजही बऱ्याच उलथापालथी झाल्या. आज नेमकं काय काय घडलं हे एका क्लिकवर पाहुयात. (Will Uddhav government be dismissed? Today’s big 10 developments in Maharashtra politics, read in detail)

१) शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी बुधवारी महाराष्ट्रातील ४० नेते त्यांच्यासोबत आसामच्या गुवाहाटी येथे आले. हे सर्व आमदार शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्त्वच्या विचारधारेचा आदर करणारे आहेत, असं शिंदे म्हणाले. त्यांच्यासोबत ४० आमदार असले तरीही त्यांच्याबाबत शिंदे यांनी काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही.

- Advertisement -

हेही वाचा – मी बंडखोर नाही, बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक, एकनाथ शिंदेंचा शिवसेनेला इशारा

२) ही राजकीय परिस्थिती अशीच कायम राहिली तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊ शकतील असं म्हटलं जात आहे. त्याआधीच शिवसेना नेते संजय राऊत यांनी विधानसभा बरखास्त होण्याच्या दिशेने जात असल्याचं म्हटलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा विधानसभा बरखास्तीच्या दिशेने.., खासदार संजय राऊतांचे संकेत

३) एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की ४० आमदार सध्या माझ्यासोबत आहेत, तर आणखी १० आमदार माझ्यासोबत येणार आहेत.

४) भाजप खासदार पल्लब लोचन दास आणि सुशांत बोरगोहेन यांनी शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि ४० आमदारांचं गुवाहाटीमध्ये मोठ्या कडेकोट बंदोबस्तात स्वागत केलं, तसेच, एका मोठ्या हॉटेलमध्ये राहण्याची त्यांची सोय केली.

हेही वाचा – असली गुवाहाटीत, नकली ‘वर्षा’वर; मनसेची ठाकरे सरकारवर जहरी टीका

५) राज्यात घडत असलेल्या एकूण राजकीय घटनाक्रमामुळे भाजपने महाराष्ट्रातील दोन केंद्रीय नेते कपिल पाटील आणि भागवत कराड यांना मुंबईत बोलावून घेतलं आहे.

६) महाराष्ट्र काँग्रेसचे निरीक्षक आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ म्हणाले, आज देशात सौदेबाजीचे राजकारण सुरू आहे. मध्य प्रदेशचे उदाहरण तुम्हाला माहीत आहे. हे राजकारण आपल्या संविधानाच्या विरोधात असून भविष्यासाठी धोक्याची बाब आहे. आपल्या आमदारांशी कसे बोलायचे हे शिवसेनेनेच ठरवायचे आहे.

७) शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे महाराष्ट्रातील काही बंडखोर आमदारांसह गुवाहाटी येथे गेले असताना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी सांगितले की ते शिंदे यांच्याशी चर्चा करत आहेत आणि आतापर्यंतची चर्चा “सकारात्मक” झाली आहे. शिंदे आणि इतर बंडखोर आमदार पक्षात सामील होतील, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

हेही वाचा शिवसेनेचा नवा विधिमंडळ मुख्य प्रतोद नियुक्त, एकनाथ शिंदेंकडून थेट उद्धव ठाकरेंना आव्हान

८) एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, आम्ही शिवसेनेत आहोत, आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. आम्ही त्यांच्या हिंदुत्वाच्या मार्गाचे अनुसरण करत आहोत. त्यांचा हिंदुत्वाचा अजेंडा आम्ही पुढे नेऊ.

९) महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी बुधवारी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाशी (भाजप) संबंध पुन्हा मजबूत करावेत, असे सांगितले.

हेही वाचा – उद्धव ठाकरेंना नेते मानता का? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी फोन केला कट

१०) दरम्यान, आज सायंकाळी बंडखोर आमदारांसाठी ५ वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती.  शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी सुनील प्रभू यांच्या स्वाक्षरीसह एक पत्रक जारी करण्यात आलं होतं. या पत्रकानुसार शिवसेनेने बंडखोर आमदारांना अल्टिमेटम दिला होता. मात्र, शिवसेनेतील शिंदे गटाने शिवसेनेच्या विधीमंडळ मुख्य प्रतोद पदी भरत गोगावले यांची नियुक्ती करून आधी आलेले पत्रक बेकायदा असल्याचे शिंदे यांनी जाहीर केले.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -