घरताज्या घडामोडीकडक निर्बंधांत विकेंडला चिकन, मटण मिळणार का? ठाकरे सरकारचे आले स्पष्टीकरण

कडक निर्बंधांत विकेंडला चिकन, मटण मिळणार का? ठाकरे सरकारचे आले स्पष्टीकरण

Subscribe

आंबे विकणारे दुकान सकाळी अकरापर्यंत चालू ठेवल्या जाऊ शकतात का?

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत कठोर निर्बंध लागू केले आहेत. तसेच राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये वाढ करुन १४ मे पर्यंत लागू केला आहे. याबाबत मुख्यमंत्री आणि उच्चाधिकार समितीच्या मंत्र्यांनी घोषणा केली आहे. या १५ दिवसात आणि वीकेंड लॉकडाऊनमध्ये कोणती आणि अत्यवश्यक सेवेतील दुकाने सुरु राहणार आहेत. यामध्ये काय सुरु आणि काय बंद राहणार आहे याबाबत तुमच्या मनात प्रश्न पडत असतील तर त्यांची उत्तरे जाणून घ्या, राज्यभरातील चिकन, मटण, कोंबडी व इतर खाद्यपदार्थांच्या दुकान, आंबे विकणारे दुकान सकाळी अकरापर्यंत चालू ठेवल्या जाऊ शकतात का? याबाबत माहिती करुन घ्या.

प्रश्न-१  राज्यभरातील चिकन, मटण, कोंबडी व इतर खाद्यपदार्थांच्या दुकान शनिवारी व रविवारी (वीकेंड ला) उघडे ठेवता येतील का? यासंबंधीच्या मालवाहतुकीवर काही निर्बंध लादण्यात आले आहेत का?

- Advertisement -

– होय. चिकन, मटण, कोंबडी व इतर खाद्याची दुकाने आठवड्याच्या सात ही दिवस उघडे राहू शकतात. नागरिकांसाठी सकाळी ७:०० ते ११:००  पर्यंत उघडे राहू शकतात व त्यानंतर ई-कॉमर्स सेवेच्या माध्यमाने होम डिलिव्हरी करता येईल. या कालावधीनंतर जर कोणीही ही सेवा देताना आढळल्यास त्यांच्याविरोधात दंडात्मक कारवाई केली जाईल. चिकन, मटण, कोंबड्यांच्या मालवाहतुकीवर कोणतेही निर्बंध नाहीत.

२ आंबे विकणारे दुकान सकाळी अकरापर्यंत चालू ठेवल्या जाऊ शकतात का? या वेळेनंतर प्रक्रिया आणि वर्गीकरण, पिकवण्याचे काम करता येईल का?

- Advertisement -

– ग्राहकांना आंबे विक्रीचा काम सकाळी ७:०० ते ११:००  पर्यंत करता येईल. ग्राहकांची फक्त याच वेळेत व्यवसाय करता येईल. त्यानंतर सेवा देताना कोणी आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. परंतु श्रेणीकरण, वर्गीकरण व पिकवण्याचे काम यानंतरही चालू ठेवता येईल. सदर आदेशान्वये ११:०० वाजल्यानंतर होम डिलिव्हरी करता येईल किंवा स्थानीय आपत्तीव्यवस्थापन प्रशासनाने दिलेले आदेशांचे पालन करून सदर काम करता येईल. याच्या मालवाहतुकीवर कोणतेही निर्बंध असणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -