घरमहाराष्ट्रवंचितला मविआत सामिल करणार का? अजित पवारांनी स्पष्ट केली राष्ट्रवादीची भूमिका

वंचितला मविआत सामिल करणार का? अजित पवारांनी स्पष्ट केली राष्ट्रवादीची भूमिका

Subscribe

Ajit Pawar Explained NPC role about Shivsena-vanchit Alliance | राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज राष्ट्रवादी प्रदेशकार्यालयात बैठक संपल्यानंतर अजित पवारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली.

मुंबई – शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीने काल युतीची घोषणा केली. त्यानुसार, वंचित बहुजन आघाडी हा शिवसेनेचा मित्रपक्ष झाला आहे. यावरून महाविकास आघाडीत येत्या काळात वंचितलाही स्थान मिळणार का? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा असणार असे प्रश्न उपस्थित होत आहेत. यावरून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज भूमिका स्पष्ट केली. संबंध जुळले, अडचणी आल्या नाहीत तर पुढे जायला अडचण येत नाही, असं अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज राष्ट्रवादी प्रदेशकार्यालयात बैठक संपल्यानंतर अजित पवारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर प्रतिक्रिया व्यक्त केली. (Ajit Pawar Explained NPC role about Shivsena-vanchit Alliance)

अजित पवार म्हणाले की, “मुंबई महापालिकेत आज महाविकास आघाडीपैकी शिवसेनेची ताकद आहे. त्यांची निर्विवाद सत्ता आहे. याचे प्रमुख उद्धव ठाकरे आहेत. आम्ही एकत्र सरकार चालवत असताना शिवेसना-राष्ट्रवादी एकत्र काम करणार असं ठाकरेंनी सांगितलं होतं. एकत्र निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे सकारात्मक होते. परंतु, गेल्या सहा महिन्यांत राजकीय परिस्थिती बदलली आहे.”

- Advertisement -

“वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेची मी काल पत्रकार परिषद पाहिली. त्यानुसार त्यांची युती ही महानगरपालिकेच्या संदर्भातील आहे. संबंध जुळले, अडचणी आल्या नाहीत तर पुढे जायला अडचण येत नाही. त्यामुळे महानगर पालिकेच्या निवडणुकीत या दोघांची एकंदरीत युती कशापद्धतीने पुढे जाईल पाहायाला मिळेल,” असं अजित पवारांनी स्पष्ट केलं.

“जागावाटपाबाबत उद्धव ठाकरेंशी मागे बोललो होतो. त्यानुसार, महाविकास आघाडीत राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही घटकपक्षांना ज्या जागा मिळतील त्या जागांमध्ये त्यांनी त्यांच्या मित्रपक्षाला सामावून घ्यायचं असं ठरलं. मात्र, हा फॉर्म्युला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी ठरला होता. महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी नाही. मात्र, महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेसोबत जाण्याची आमची मानसिकता आहे. त्यांचा पक्ष आणि संघटन मोठं आहे त्यामुळे त्यांच्याशी याबाबत चर्चा करू असंही अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

संध्याकाळी उद्धव ठाकरेंना भेटणार

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि जयंत पाटील मातोश्रीवर आज रात्री नऊ वाजता उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. यावेळी ते शिवसेना-वंचितच्या युतीबाबतही चर्चा करणार आहेत. युतीबाबत ठाकरेंची काय भूमिका आहे ते समजून घेऊन आणि मग आम्ही आमची भूमिका घेऊ, असं अजित पवार म्हणाले. घटकपक्षांनी कोणाला मित्रपक्ष म्हणून घ्यायचं हा त्यांचा अधिकार आहे. ज्याने त्याने आपल्या कोट्यामध्ये मित्रपक्षाला सामावून घेतलं तर इतरांची हरकत असायचं कारण नाही, असंही पवारांनी पुढे स्पष्ट केलं.

पोटनिवडणूक लढवणार का?

चिंचवड आणि कसबा या दोन्ही जागेतील पोटनिवडणुकीबाबत राष्ट्रवादीच्या पक्ष पातळीवर चर्चा झाली आहे. आघाडी म्हणून काँग्रेस आणि शिनसेनेसोबत चर्चा करू. त्यानंतर अंतिम निर्णय सांगू, असं अजित पवार म्हणाले.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -