घरक्रीडाठाणे महापालिका अॅथलेटिक्स प्रशिक्षण योजनेला विजेतेपद

ठाणे महापालिका अॅथलेटिक्स प्रशिक्षण योजनेला विजेतेपद

Subscribe

ठाणे जिल्हा हौशी अॅथलेटिक्स संघटनेच्यावतीने राज्य निवड चाचणी मैदानी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत ठाणे महापालिका अॅथलेटिक्स प्रशिक्षण योजनेने निर्विवाद वर्चस्व राखलं आहे.

ठाणे जिल्हा हौशी अॅथलेटिक्स संघटनेच्यावतीने राज्य निवड चाचणी मैदानी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत ठाणे महापालिका अॅथलेटिक्स प्रशिक्षण योजनेने निर्विवाद वर्चस्व राखलं आहे. राज्य निवड चाचणी मैदानी स्पर्धा मुंब्रा येथील मौलाना अब्दुल कलाम आझाद स्टेडियममध्ये पार पडली.

या स्पर्धेत ठाणे महापालिका अॅथलेटिक्स प्रशिक्षण योजनेने तब्बल ६५ गुणांची कमाई करत स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद संपादन केले. यावेळी सुमारे ४१ क्रिडा प्रकारांच्या पुरुष आणि महिलांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात ठाणे जिल्ह्यातील २००हुन अधिक खेळाडू सहभागी झाले होते.

- Advertisement -

या स्पर्धेतून भोसरी येथे होणाऱ्या आगामी महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी स्पर्धेकरता ठाणे जिल्ह्याच्या प्रातिनिधिक संघाची निवड करण्यात आली. राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी स्पर्धा २१ ते २३ एप्रिल दरम्यान होणार आहे.

ठाणे जिल्ह्याचा संक्षिप्त प्रातिनिधिक संघ :

- Advertisement -
  • गोळा फेक – तेजस डोंगरे, श्रेयस खाडे (दोन्ही ठाणे महापालिका अॅथलेटिक्स प्रशिक्षण योजना)
  • लांब उडी – तेजस भाकरे (ठाणे महापालिका अॅथलेटिक्स प्रशिक्षण योजना)
  • थाळी फेक – तेजस डोंगरे (ठाणे महापालिका अॅथलेटिक्स प्रशिक्षण योजना)
  • महिला ४०० मिटर – निधी सिंग, आकांक्षा गावडे (दोन्ही ठाणे महापालिका अॅथलेटिक्स प्रशिक्षण योजना)
  • ४०० मिटर हर्डल्स – निधी सिंग (दोन्ही ठाणे महापालिका अॅथलेटिक्स प्रशिक्षण योजना), दामिनी पेडणेकर (ऊर्जा अकॅडमी)
  • ३००० मिटर स्टिपलचेस – करण शर्मा (रनहॉलिक्स अकॅडमी)
  • १०० मीटर पुरुष – जय भोईर, शंतनु सिंग (दोन्ही फादर अग्नेल स्पोर्ट्स क्लब), अक्षय खोत (ठाणे महापालिका अॅथलेटिक्स प्रशिक्षण योजना)

हेही वाचा – CNG Price Hike : नागपुरात सीएनजीच्या दरात 3.50 रुपयांनी वाढ

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -