कोरोना, लॉकडाऊन त्यांचा आवडता विषय; मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंना डिवचले

winter session 2022 cm eknath shinde slams uddhav thackeray on corona lockdown china

सरकार बदलले नसते तर विदर्भात अधिवेशन झाले नसते. चीन, कोरिया, जपानमध्ये कोरोना सुरु झाला, तो निकष जर आपल्याकडे लावून विदर्भात अधिवेशन घेतले नसते. अजित पवार यांना माहित आहे की, कोविड आणि लॉकडाऊन कुणाचा आवडता विषय आहे, म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. आज विधिमंडळात विरोधकांच्या प्रश्नांवर उत्तर देताना ते बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, देशासाठी महाराष्ट्र व महाराष्ट्रासाठी विदर्भ महत्वाचा आहे. विदर्भाचा विकास आम्ही केंद्रस्थानी मानतो. यात नागपूर मुंबई समृद्धई महामार्ग सुरु झाला. तो सुरु करुन उद्याच्या उज्ज्वल भवितव्याचा महामार्ग सुरु केला, विदर्भातील समृद्धी महामार्गामुळे १० जिल्हे आणि १४ जिल्हे अप्रत्यक्षरित्या जोडत आहोत. मराठवाड्यात जालना- नांदेडलाही जोडत आहोत, इंटरस्टेटही हा मार्ग कनेक्ट केला जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, समृद्धी महामार्ग विदर्भासाठी गेमचेंजर ठरणार आहे. या महामार्गाच्या उद्धाटनावरून विरोधकांनी वाद घातला. त्याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे हा महामार्ग होऊ नये त्य़ासाठी शेतकऱ्यांना जमिनी देऊ नये यासाठी प्रयत्न केले गेले, असा आरोपही त्यांनी केला. विदर्भाच्या बाबतीत सर्वांना संवेदना असावी, विदर्भाला काहीतरी द्यायला हवे. कालबद्ध पाऊले टाकण्याची इच्छाशक्ती हवी. सरकार म्हणून जबाबदारी पाळणार व काहीतरी ठोस निर्णय घ्यायचे आहेत. विदर्भ मजबूत तर राज्य मजबूत, विदर्भाच्या संपूर्ण विकासाशिवाय महाराष्ट्र विकास पूर्ण होऊ शकत नाही, असही एकनाथ शिंदे म्हणाले.

मराठवाडा, विदर्भाचा अनुशेष भरून काढण्याचा प्रयत्न आमचा आहे. आम्हाला जबाबदारी पूर्ण माहीत आहे. काम करताना याचा आम्हाला फायदा होईल. मुख्यमंत्रीपद मराठवाड्याकडे किती काळ होते हे सर्वांना माहीत आहे. विदर्भाला मुख्यमंत्रीपद किती काळ होते हे सर्वांना माहित आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने विदर्भाचा अनुशेष दूर करण्यासाठी मविआला न्याय देता आला असता. असही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.


मविआच्या काळात MIDC मध्ये 3 हजार कोटींचा घोटाळा; भातखळकरांचा आरोप, भास्कर जाधव संतापले