घरमहाराष्ट्रपवारांनी 2004 मध्ये संधी असतानाही अजितदादांना मुख्यमंत्री केलं नाही; फडणवीसांची विधानसभेत टोलेबाजी

पवारांनी 2004 मध्ये संधी असतानाही अजितदादांना मुख्यमंत्री केलं नाही; फडणवीसांची विधानसभेत टोलेबाजी

Subscribe

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आता विदर्भ, मराठवाड्याच्या प्रश्नावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप- प्रत्यारोप सुरु आहेत. यात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना मुख्यमंत्री पदाची संधी न मिळाल्याचा मुद्दा उपस्थित करत खरमरीत टोला लगावला आहे. काल अजित पवार यांनी

काल अजित पवार यांनी बोलताना सरकारामध्ये एकही महिला नेत्याचा समावेश नाही म्हणत अमृता वहिणींना सांगतो असं म्हटलं होतं, त्यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, अजित दादा मला म्हणाले अमृताशी बोला पण तुम्ही असं बोलताना सुनेत्रा वहिनींना विचारलं होत का? असा मिश्किल प्रश्नही फडणवीसांनी केला आहे.

- Advertisement -

अजित दादा संधी असतानाही तुम्हाला शरद पवारांनी मुख्यमंत्री केलं नाही 

फडणवीस पुढे म्हणाले की, आता दादांनी अनेक गोष्टींवर चर्चा केली की कोण मुख्यमंत्री झाले, कुठले मुख्यमंत्री झाले. पण एका गोष्टीचं दु:ख आहे की, संधी मिळाली असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तुम्हाला मुख्यमंत्री केलं नाही. 2004 ला संधी होती, राष्ट्रवादीचे जास्त लोकं निवडून आले होते. तुमच्या कराराप्रमाणे ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री होता. पण संधी काही तुम्हाला मिळाली नाही, असा टोलाही फडणवीसांनी अजित पवार यांना लगावला आहे.

अजित दादा तुम्हा मला ट्विटरवर फॉलो करा

वीज तोडण्याचा जीआर अजित पवार यांना का नाही सापडला? तो ट्विट केला होता फेसबुकवर टाकला होता. त्यानंतर सगळ्यांना पाठवलाही. अजित दादा तुम्हा मला ट्विटरवर फॉलो करा असा मिश्किल टोलाही फडणवीसांनी लगावला आहे. ज्यावर फडणवीस पुढे म्हणाले की, ते विरोधी पक्ष नेते म्हणून मला फॉलो करतात मी उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना फॉलो करतो.

- Advertisement -

अजित पवार यांचे भाषण १०० टक्के त्यांचं वाटत नव्हत तर ५० टक्के भाषण हे जयंत पाटील यांचेही वाटत होतं. जयंत पाटील विधानसभेत नसल्यामुळे अर्ध भाषण त्यांनी लिहून दिलं असा भास अजित पवार यांच्या भाषणातून होत असल्याचा दावा यावेळी फडणवीसांनी केला होता.


शरद पवारांची पंतप्रधान मोदींच्या आईची प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना; पत्र पाठवत म्हणाले…

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -