घरमहाराष्ट्रWinter Session : अधिवेशनात सरकारला घेरण्याची रणनीती; महाविकास आघाडीच्या बैठकीत काय ठरलं?

Winter Session : अधिवेशनात सरकारला घेरण्याची रणनीती; महाविकास आघाडीच्या बैठकीत काय ठरलं?

Subscribe

मुंबई : येत्या 7 डिसेंबरपासून  नागपूर येथे सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी पक्षाला राज्यातील ज्वलंत प्रश्नांवर घेरण्याचा निर्धार आज (2 डिसेंबर) महाविकास आघाडीच्या बैठकीत घेण्यात आला. अधिवेशनात कोणत्या दिवशी कोणत्या मुद्द्यांना प्राधान्य द्यायचे, याची चर्चा अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपूरमध्ये आयोजित बैठकीत केली जाणार आहे. (Winter Session A strategy to encircle the government in session What was decided in the Mahavikas Aghadi meeting)

हेही वाचा – Parliament Winter Session : सर्व विषयांवरील चर्चेसाठी केंद्र तयार; विरोधकांना सहकार्य करण्याचे आवाहन

- Advertisement -

मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यात मराठा आणि ओबीसी असा संघर्ष उभा राहिला आहे. याशिवाय धनगर समाजाने अनुसूचित जमातीत समावेशाची मागणी लावून धरली आहे. या मागणी विरोधात आदिवासी रस्त्यावर उतरले आहेत. याशिवाय राज्याच्या विविध भागात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. या पार्श्वभूमीवर पुढील आठवड्यात होत असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात रणनीती ठरविण्यासाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या विधानभवनातील दालनात आज  महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली.

राज्यात शेतकरी, दुष्काळ, महागाई, बेरोजगारी हे प्रश्न गंभीर आहेत. याशिवाय सरकारमध्ये भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. राज्यातील जनतेसमोरील  या महत्वाच्या प्रश्नांवर  आज चर्चा झाली. हे सर्व विषय धरून पुढे कसे न्यायचे यावर चर्चा सविस्तर झाली. सरकार आज फक्त आरक्षण आणि एकमेकांवर बोलत असून जनतेच्या मूलभूत प्रश्नांना बगल देण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे 6 डिसेंबरला नागपूरला होणाऱ्या बैठकीत सविस्तर चर्चा होईल. याशिवाय हिवाळी अधिवेशनाचा कालावधी कमी असून तो वाढवावा, अशी मागणी करण्यात येणार असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी बैठकीनंतर दिली.

- Advertisement -

हेही वाचा – Lonikar vs Tope : राजेश टोपेंच्या गाडीवर अन् बबनराव लोणीकरांच्या घरावर दगडफेक; दोघांकडून एकमेकांवर आरोप

दरम्यान, या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात,  माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या  शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे  नेते अनिल परब, सुनील प्रभू, अजय चौधरी, जनता दल संयुक्तचे नेते कपिल पाटील, समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी, काँग्रेसचे आमदार अमीन पटेल आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -