घरमहाराष्ट्रहिवाळी अधिवेशन १२ डिसेंबर पासून?

हिवाळी अधिवेशन १२ डिसेंबर पासून?

Subscribe

मुंबई :  राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तारखेत बदल होण्याची शक्यता आहे. अधिवेशन १९ डिसेंबर ऐवजी १२ डिसेंबर २०२२ पासून सुरु होण्याची शक्यता आहे. याबाबत अजून अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र, संसदीय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाच्या तारखेबाबत अंतिम निर्णय होणार आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा लक्षात घेऊन राज्य सरकारने हिवाळी अधिवेशनासाठी १९ डिसेंबर ही तारीख निश्चित केली आहे. मात्र, गुजरात विधानसभेसाठी १ आणि ५ डिसेंबर २०२२ अशा दोन टप्प्यात मतदान होऊन ८ डिसेंबरला निकाल घोषित होणार आहे. गुजरात निवडणुकीची प्रक्रिया ८ डिसेंबरला संपत असल्याने विधिमंडळाचे अधिवेशन एक आठवडा आधी म्हणजे १९ डिसेंबरऐवजी १२ डिसेंबरपासून सुरु होऊ शकते, अशी चर्चा मंत्रालयात सुरु आहे.

- Advertisement -

ऑगस्ट महिन्यात पार पडलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी हिवाळी अधिवेशन नागपूर येथे १९ डिसेंबर पासून सुरु होईल, असे घोषित करण्यात आले होते. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या संभाव्य तारखा लक्षात घेऊन हिवाळी अधिवेशनाची तारीख निश्चित करण्यात आली होती. परंतु आता गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने हिवाळी अधिवेशनाच्या तारखेत बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


आदित्य ठाकरेंच्या सिल्लोडमधील सभेला परवानगी; ‘या’ ठिकाणी होणार सभा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -