घरमहाराष्ट्रनागपूरWinter Session : चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांचा बहिष्कार; शंभरहून अधिक मोर्चे विधिमंडळावर धडकणार

Winter Session : चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांचा बहिष्कार; शंभरहून अधिक मोर्चे विधिमंडळावर धडकणार

Subscribe

राज्यात सध्या सुरू असलेल्या विविध समाजाच्या आरक्षणाच्या मागणीचा मुद्दा गाजत आहे. सोबतच काही दिवसांपासून अवकाळी पावसाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे.

नागपूर : हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. त्यााधी होणाऱ्या आजच्या चहापान कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. असे असतानाच अधिवेशन काळात राज्यातील विविध भआगातून जळपास 100 हून अधिक मोर्चे विधिमंडळावर धडकणार असून, आतापर्यंत 45 मोर्चांना परवानगी देण्यात आली. असे जरी असले तरी यंदाचा अधिवेशन हे सभागृहात आणि सभागृहाबाहेर गाजण्याची शक्यता आहे. (Winter Session Opposition boycotts tea ceremony More than hundred marches will strike the legislature)

राज्यात सध्या सुरू असलेल्या विविध समाजाच्या आरक्षणाच्या मागणीचा मुद्दा गाजत आहे. सोबतच काही दिवसांपासून अवकाळी पावसाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे. यासोबतच नुकत्याच जाहीर झालेल्या एनसीआरबीच्या अहवालात महाराष्ट्र गुन्हेगारीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आल्याने विरोधकांनी गृहमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे. ही सगळी मुद्दे येत्या अधिवेशनात चर्चिल्या जाण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

हेही वाचा : PRANAB MUKHERJEE : ‘मला ‘त्या’ पंतप्रधान करणार नाहीत’; प्रणव मुखर्जींच्या पुस्तकातून गौप्यस्फोट

महाविकास आघाडीच्या बैठकीत सत्ताधाऱ्यांना घेरण्याची रणनिती

नागपूर येथे गुरुवारपासून सुरु होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीची बैठक बुधवारी (6 डिसेंबर) पार पडली. यावेळी विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, अजय चौधरी उपस्थित होते. यावेळी सत्ताधाऱ्यांना घेरण्याची रणनिती ठरविण्यात आल्याची चर्चा आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Maratha Reservation : राज्य सरकारच्या क्युरेटिव्ह पिटिशनवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त

हिवाळी अधिवेशनाला 7 डिसेंबरपासून उपराजधानीत सुरुवात होणार आहे. या दरम्यान कायदा व सुव्यवस्थेसह मोर्चा आणि नेत्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने 11 हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या फौजफाटा लावण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. विशेष म्हणजे, 8 आठ राज्य राखीव दलाच्या कंपनी आणि एक हजार होमगार्डचा समावेश करण्यात आले आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने शहरात राज्याचे मंत्रिमंडळ आणि विविध राजकीय नेत्यांची वर्दळ असते. अशावेळी त्यांच्या सुरक्षेसह मोर्चा आणि इतर विभागांच्या सुरक्षिततेसाठी शहरातील पाच हजार तर बाहेरील राज्यातील 6 हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. अधिवेशनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस आयुक्तांनी आज सकाळपासून बैठका लावून आढावा घेतला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -