घरमहाराष्ट्रनागपूरWinter Session : 'समृद्धी'वरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये सवाल-जवाब सुसाट

Winter Session : ‘समृद्धी’वरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये सवाल-जवाब सुसाट

Subscribe

विधान परिषदेचे कामकाज काही वेळासाठी तहकूब करण्यात आले होते. दहा मिनिटांच्या विश्रांतीनंतर सुरू झालेलेल्या कामकाजामध्ये राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार अमोल मिटकरी यांनी प्रवासी वाहतुकीसाठी सुरू झालेल्या समृद्धी महामार्गावरील अपघाताची संख्या त्यांनी सभागृहात मांडली.

नागपूर : समृद्धी महामार्गावरु मागील नऊ महिन्यांपासून झालेल्या अपघातांच्या संख्येवरून विरोधकांनी सरकारला चांगलाच घेरल्याचे चित्र आज शुक्रवारी (8 डिसेंबर) पहायाला मिळाले. याला मंत्री दादा भुसे यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. (Winter Session The opposition besieged the government over the number of accidents on Samriddhi Highway)

विधान परिषदेचे कामकाज काही वेळासाठी तहकूब करण्यात आले होते. दहा मिनिटांच्या विश्रांतीनंतर सुरू झालेलेल्या कामकाजामध्ये राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार अमोल मिटकरी यांनी प्रवासी वाहतुकीसाठी सुरू झालेल्या समृद्धी महामार्गावरील अपघाताची संख्या त्यांनी सभागृहात मांडली. ते म्हणाले की, समृद्धी महामार्गावर मागील 9 महिन्यांत 860 अपघात झाले. यामध्ये नागपूर विभागात 529 अपघात होऊन 73 जणांचा मृत्यू झाला. यासोबतच संभाजीनगर विभागात 297 अपघात होऊन 23 जणांचा मृत्यू तर पुणे विभागात 14 अपघात झाले असून 9 जणांचा मृत्यू झाला. आणि ठाणे विभागात 20 अपघात होऊन 7 जणांचा मृत्यू झाला. असे एकूण 860 अपघात होऊन 112 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी सभाहात मांडली. यासोबतच त्यांनी प्रादेशिक कार्यालयातील उत्तरही सभागृहात वाचून दाखवले. ते म्हणाले की, उत्तरामध्ये प्रादेशिक कार्यालयाने नमूद केले की, मूळ चेसीसमध्ये छेडछाड करून अधिकचा साठा घेऊन वाहतूक केल्याचे उत्तर देण्यात आले. मग एनओसी देणाऱ्यांवर कारवाई करणार आहात का? नोंदणीकृत वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा वाहतूक होत असेल तर मग त्यांच्यावर कारवाई करणार का? तर या महामार्गावर कुठल्याही प्रकारची शिस्त पाळल्या जात नाही. ती लावण्यात येईल का? असे प्रश्न त्यांनी सरकारला विचारले. यासोबतच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अपघात करणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला का? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

- Advertisement -

हेही वाचा : WINTER SESSION : “सरकारला लाज वाटली पाहिजे…”, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विजय वडेट्टीवार संतापले

60 लाख वाहनांनी केला यशस्वीरित्या प्रवास

विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री दादा भुस म्हणाले की, समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघाताची संख्या नाकारता येत नाही. परंतू याच नऊ महिन्यांत तब्बल 60 लाख वाहनांनी यशस्वीरित्या प्रवास केला. तर अपघात रोखण्यासाठी संबंधित विभागातून योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील. तर अपघात झाल्यानंतर पाच ते दहा मिनिटांच्या आत मदत दिली जात आहे. तर आगामी एक ते दीड महिन्याच्या आत 16 ठिकाणी पेट्रोल, चहा नाश्त्याची सोय केली जाणार आहे. अपघात रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जाणार आहेत.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -