घरमहाराष्ट्रWinter Session : सत्ताधाऱ्यांचे मुंबईबाबतच्या चर्चेचे ठाकरे गटाने स्वीकारले आव्हान; ऐन थंडीत...

Winter Session : सत्ताधाऱ्यांचे मुंबईबाबतच्या चर्चेचे ठाकरे गटाने स्वीकारले आव्हान; ऐन थंडीत कोणाला फुटणार घाम?

Subscribe

मुंबई :  गुरुवार (7 डिसेंबर) पासून हिवाळी अधिवेशन (Winter Session) सुरू होणार आहे. पण त्याआधीच राजकीय वातावरण तापासला सुरुवात झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येताना दिसत आहेत. मात्र उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात मुंबईतील (Mumbai) विकासकामे, प्रकल्प आणि महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून ठाकरे (Thackarey) आणि शिंदे (Shinde) गटात खडाजंगी होण्याची शक्यता आहे. मुंबई मुद्द्यांवरील चर्चेचे सत्ताधाऱ्यांचे आव्हान ठाकरे गटाने स्विकारले आहे. त्यामुळे नागपुरच्या (Nagpur) थंडीत हिवाळी अधिवेशनात कोणत्या गटाला घाम फुटणार हे पाहावे लागेल. (Winter Session The Thackeray group accepted the challenge of ruling leader discussion about Mumbai Who will sweat in the cold)

हेही वाचा – Vijay Wadettiwar : शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं असताना सरकार ‘शासन आपल्या दारी’चा डंका पिटतंय

- Advertisement -

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान, संत्री उत्पादक शेतकऱ्याला योग्य भाव न मिळणे, राज्यातील वाढते ड्रग्ज प्रकरण, कायदा व सुव्यवस्था, कांदा अनुदान, मराठा आरक्षण, शेतकरी आत्महत्या, राज्यात वाढणारी गुन्हेगारी, महिलांची सुरक्षा या विषयांवर यंदाचे हिवाळी अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे. असे असले तरी ठाकरे गटाच्या ‘शिवालय’ या राज्य जनसंपर्क कार्यालयाचे मंगळावारी (5 डिसेंबर) उद्घाटन झाल्यानंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुका आणि कंत्राटदारावरून एकनाथ शिंदेंसह भाजपाला डिवचले होते. त्यानंतर आता उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर सत्ताधारीही आक्रमक होणार असल्याचे संकेत आहेत. ठाकरे गटाचे सरकार असताना मुंबईत झालेल्या काही घोटाळ्यांसंदर्भात सत्ताधारी ठाकरे गटाला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत.

हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळातील घोटाळ्यांची यादी बाहेर काढण्याची तयारी करत आहेत. कोरोना काळातील घोटाळे, रस्ते घोटाळे, नाले सफाई घोटाळा किंवा खिचडी घोटाळ्यांप्रकरणी सत्ताधाऱ्यांनी यापूर्वी ठाकरे गटावर आरोप केले होते. मात्र आता या सर्व प्रकरणाची चौकशी लावण्याच्या तयारीत सत्ताधारी दिसत आहेत. असे असले तरी याआधी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या कारभाराबाबत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

- Advertisement -

मुंबई महापालिकेच्या गेल्या काही काळापासून निवडणूका झालेल्या नाहीत. त्यामुळे त्याठिकाणी सध्या प्रशासकाच्या माध्यमातून राज्य सरकारचे महापालिकेवर नियंत्रण आहे. याचपार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी आमुंबई महापालिकेत मुख्यमंत्र्याच्या जवळच्या कंत्राटदारांच्या फायद्यासाठी निर्णय घेतले जात आहेत, असा गंभीर आरोप केला होता. याशिवाय त्यांनी मुंबई महापालिकेवर मोर्चादेखील काढला होता. त्यामुळे यंदाच्या हिवाळी अधिवेशनात ठाकरे आणि शिंदे गटात गदारोळ होणार निश्चित आहे.

हेही वाचा – Winter Session : चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांचा बहिष्कार; शंभरहून अधिक मोर्चे विधिमंडळावर धडकणार

सत्ताधाऱ्यांचे आव्हान ठाकरे गटाने स्वीकारले

शिवसेना ठाकरे गटानेदेखील सत्ताधाऱ्यांचे मुंबईवरील चर्चेचे आव्हान स्वीकारले आहे. या अधिवेशनात ‘दूध का दूध, पानी का पानी’ होऊन जाऊ द्या, असं ठाकरे गटाचे प्रतोद आणि मुंबईचे माजी महापौर सुनील प्रभू यांनी म्हटलं आहे. या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर आम्ही बोलूच, मात्र मुंबईच्या बाबतीत जे काही सुरू आहे, याप्रकरणी सरकारला प्रश्न विचारू. मुंबई कोणाच्या घशात घालायला निघाले आहेत हे सर्वांना माहित आहे, असा आरोप सुनील प्रभू यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -