घरताज्या घडामोडीउपसभापतींनी कामकाज तहकूब केले अन् फडणवीस भडकले; वाचा नेमके काय घडले?

उपसभापतींनी कामकाज तहकूब केले अन् फडणवीस भडकले; वाचा नेमके काय घडले?

Subscribe

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून या दिवसाची सुरुवात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या घोषणाबाजीने झाली. शिवाय, विधान परिषदेतही जोरदार सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून या दिवसाची सुरुवात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या घोषणाबाजीने झाली. शिवाय, विधान परिषदेतही जोरदार सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी गोंधळ अधिक होत असल्यामुळे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण मध्येच थांबवून कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब केले. त्यानंतर हे बरोबर नाही म्हणत देवेंद्र फडणवीस कमालीचे भडकले. (winter session this is not right devendra fadnavis angry on deputy chairperson neelam gorhe)

नेमके काय घडलं?

- Advertisement -

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी नागपूरातील ८३ कोटीचा भूखंड २ कोटी रुपयांना देणे म्हणजे मंत्री पदाचा दुरुपयोग तत्कालीन नगरविकास मंत्री तसेच विद्यमान मुख्यमंत्र्यांनी केला आहे, असा आरोप केला. एकनाथ खडसेंच्या या आरोपानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या भूखंडाची माहिती देण्यासाठी उभे राहिले. त्यावेळी या भूखंडाबाबत माहिती देताना सुरुवातीला देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एकनाथ खडसे आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सभागृहाची दिशाभूल करत असल्याचे सांगितले. त्यानंतर पुढे ते स्पष्टीकरण देत असताना सत्ताधारी आणि विरोधकांमधील गोंधळ वाढला.

परिणामी, उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे भाषण थांबवले आणि मी सभागृहाचे कामकाज 15 मिनिटं तहकूब करत असल्याचे सांगितले. सभापतींच्या या घोषणेनंतर देवेंद्र फडणवीस संतापले आणि त्यांनी हे बरोबर नाही, असे वारंवार बोलत संताप व्यक्त केला. तसेच, “खोदा पहाड निकला चुहाँ”, असा टोलाही विरोधकांना लगावला.

- Advertisement -

काय आहे प्रकरण?

नागपूरमधील झोपडपट्टीधारकांच्या आवास योजनेसाठी भूखंड ताब्यात घेण्यात आले होते. जे १६ जणांना भाडेतत्त्वावर दिले असल्याचे निदर्शनास आले. हे भूखंड तत्कालीन नगरविकास मंत्री यांच्या आदेशानुसार वाटप केल्याचे याचिकेत म्हटले आहे. हा मुद्दा न्यायालयात प्रलंबित असल्याने तत्कालीन नगरविकास मंत्री यांनी घेतलेल्या निर्णयाला न्याय प्रशासनातील हस्तक्षेप असल्याचे म्हणत न्यायालयाने स्थगितीचे आदेश दिले.

दरम्यान, हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही विरोधक सरकारच्या विरोधात अनेक मुद्द्यावरून आक्रमक झाले आहे. 50 खोके एकदम ओके असे बॅनर घेऊन विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली.

‘गुजरात तुपाशी, महाराष्ट्र उपाशी’ असे बॅनरही घेऊन घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले, प्रताप सरनाईक आणि भाजपचे नेते प्रवीण दरेकर घोषणाबाजी करण्यासाठी विधानभवनाच्या पायऱ्यांवर उभे राहिले. यावेळी 50 आमदार एकदम ओके, घरी बसले बोके, असे बॅनर घेऊन घोषणाबाजी केली. त्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला होताा. याच दरम्यान, ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सुद्धा तिथून सभागृहात गेले होते. त्यावेळी शिंदे गटाच्या आमदारांनी आपली घोषणाबाजी सुरूच ठेवली.


हेही वाचा – राज्यात लवकरच लव्ह जिहादविरोधी कायदा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे संकेत

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -