राज्यात पुन्हा गारठा वाढला, कोकणात तर पावसाची हजेरी

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्यात हिवाळ्यातील थंडी पडण्यास सुरुवात झाली. मात्र मागील आठवड्याभरापासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये त तापमान स्थिर होते. अशात मंगळवारपासून विदर्भ, उत्तर व पश्चिम महाराष्ट्रात किमान तापमान घसरल्याने थंडीने दमदार कमबॅक केले. जळगाव, औरंगाबादसह मुंबईतही मंगळवारी थंडी जाणवू लागली. यासह अनेक जिल्ह्यातील तापमान हळूहळू कमी होत असून थंडीचा तडाखा वाढत आहे. यामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पुढील काही दिवसात थंडीचे प्रमाण वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ॉ

हिमालयाच्या पश्चिमी भागात पुढील दोन दिवसांच्या सुमारास चक्रवात धडकणार आहे, त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांत ढगाळ वातावरण तयार झाले आहे. परिणामी अनेक ठिकाणी थंडी वाढल्याने शेकोट्या पेटल्या आहेत.

राज्यातील मराठवाड्यासह कोकणात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण आले आहे. यामुळे कोकणातील सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. दोन्ही जिल्ह्यात सतत वाढणाऱ्या कडाक्याच्या थंडीमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. कोकणासह मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमधील तापमान घटल्याने थंडीचा पारा वाढतोय. अशा परिस्थिती पुढील दोन ते तीन दिवसांत राज्यातील अनेक भागात थंडी वाढण्याची शक्यता आहे.

गोंदिया-११.२, वर्धा-१२, नागपूर-११.३, जळगाव-१२.३, सातारा-२०.६, सोलापूर-१८.५, मुंबई-२०.८, रत्नागिरी-२२, पुणे-१५, कोल्हापूर-२२.८, औरंगाबाद-१२.३, नाशिक-१३, सांगली-२१.८,

यंदा महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाला होता. पावसाळा संपल्यानंतर यावर्षी हिवाळ्यात थंडीचं प्रमाण कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे हिवाळ्याच्या तिसऱ्या महिन्यात राज्यात थंडीचा जोर वाढणार असल्याची शक्यता आहे.


उद्धव ठाकरेंच्या बेहिशेबी मालमत्तेवर होणार सुनावणी; गौरी भिडेंची याचिका मंजूर