Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र ६६ हजार प्रवाशांचा व्हिस्टाडोममधून प्रवास; मध्य रेल्वेला ८ कोटींचा महसूल

६६ हजार प्रवाशांचा व्हिस्टाडोममधून प्रवास; मध्य रेल्वेला ८ कोटींचा महसूल

Subscribe

मुंबईः मध्य रेल्वेवरील व्हिस्टाडोम डब्यांना प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.  मुंबई- गोवा मार्गावरील दऱ्या, नद्या आणि धबधब्यांची चित्तथरारक दृश्ये असोत किंवा मुंबई – पुणे मार्गावरील पश्चिम घाटाची नयनरम्य दृश्ये असोत, काचेचे टॉप आणि रुंद खिडक्या असलेले हे डबे हिट ठरले आहेत. नोव्हेंबर 2022 ते एप्रिल 2023 या काळात तब्बल ६६ हजार प्रवाशांनी व्हिस्टाडोममधून प्रवास केला. यातून रेल्वेला ८.४१ कोटींचा महसूल मिळाला आहे.

नोव्हेंबर 2022 ते एप्रिल 2023 या सहा महिन्यांसाठी मध्य रेल्वेने चालवलेल्या 9 विस्टाडोम कोचने मध्य रेल्वेला चांगली कमाई करुन दिली आहे. 6 महिन्यांच्या कालावधीत या 9 गाड्यांची एकूण 66,307 प्रवाशांची नोंदणी करून 8.41 कोटी महसूल मिळवला आहे.

- Advertisement -

मुंबई – मडगाव – मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस ही 100% पेक्षा जास्त वहिवाट (occupancy) म्हणजे 8256 प्रवासीसंख्येसह सर्वात पुढे असून 1.71 कोटी महसूल मिळविला आहे. पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेसने 100% पेक्षा जास्त वहिवाट (occupancy) नोंदवली आहे. अप दिशेला म्हणजेच पुणे ते मुंबई प्रवासाने 6.96 कोटी कमाई केली आहे.
मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेस 98.8% व्याप्तीसह (occupancy) म्हणजेच 15,564 प्रवासी आणि 1.18 कोटी महसूल मिळविला आहे. वर्ष 2018 मध्ये मुंबई- मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये विस्टाडोम कोच पहिल्यांदा मध्य रेल्वेत सादर करण्यात आले. प्रवाशांच्या प्रचंड मागणीमुळे, मुंबई – मडगाव मार्गावरील दुसरा विस्टाडोम कोच 15 सप्टेंबर 2022 पासून तेजस एक्सप्रेसला जोडण्यात आला.

या डब्यांच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे हे डबे मुंबई – पुणे डेक्कन एक्स्प्रेसमध्ये 26 जून 2021 पासून सुरू करण्यात आले आणि प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन मुंबई-पुणे मार्गावरील आणखी दोन विस्टाडोम डबे डेक्कन क्वीनला 15 ऑगस्ट 2021 पासून आणि प्रगती एक्स्प्रेसमध्ये 25 जुलै 2022 पासून जोडण्यात आले. तसेच पुणे – सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेसमध्ये देखील एक विस्टाडोम कोच 10 ऑगस्ट 2022 पासून जोडण्यात आला आहे.

- Advertisement -

व्हिस्टाडोम डब्यांमध्ये काचेच्या छताशिवाय रुंद खिडक्या, एलईडी दिवे, फिरता येण्याजोग्या सीट आणि पुशबॅक खुर्च्या, इलेक्ट्रिकली ऑपरेटेड ऑटोमॅटिक स्लाइडिंग कंपार्टमेंट डोअर्स, दिव्यांगांसाठी रुंद बाजूचे सरकते दरवाजे, सिरेमिक टाइल फ्लोअरिंग असलेली टॉयलेट इत्यादी  अनेक वैशिष्ट्यांसह आकर्षक व्ह्यूइंग गॅलरी आहे.

- Advertisment -