घरताज्या घडामोडीपत्रकारितेतील 'न्यू नॉर्मल'साठी सतत अद्ययावत राहावे - आनंद आगाशे

पत्रकारितेतील ‘न्यू नॉर्मल’साठी सतत अद्ययावत राहावे – आनंद आगाशे

Subscribe

‘डिजिटल माध्यमांसाठी तंत्रज्ञान सतत वेगाने बदलत असल्याने, ‘न्यू नॉर्मल’ परिस्थिती समजून घेण्यासाठी पत्रकारांनी ज्ञान सतत अद्ययावत करण्याची गरज आहे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आनंद आगाशे यांनी केले. पत्रकार विश्वनाथ गरूड लिखित, ‘गमभन’ प्रकाशनातर्फे प्रकाशित ‘डिजिटल पत्रकारिता’ (दुसरी आवृत्ती), ‘डिजिटल बातम्या आणि एसईओ’ (प्रथम आवृत्ती) या दोन पुस्तकांच्या प्रकाशनप्रसंगी आगाशे बोलत होते. आनंद आगाशे, प्रकाशक ल. म. कडू, माहिती तंत्रज्ञान आणि डिजिटल प्रमोशन तज्ज्ञ स्वप्नील नरके यांच्या हस्ते पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या कमिन्स सभागृहात हा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. नगरसेवक धीरज घाटे यांच्यासह अनेक मान्यवर तसेच पत्रकारितेतील विद्यार्थी उपस्थित होते.

आनंद आगाशे म्हणाले, ‘जगाबरोबर वृत्तपत्रसृष्टी, डिजिटल मीडिया सतत बदलत आहे. नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. आजचे ‘न्यू नॉर्मल’ उद्या नॉर्मल होत आहे, आणि नवे ‘न्यू नॉर्मल’समोर येत आहे. अशा वेळी पत्रकारांनी तंत्रस्नेही राहून सतत अद्ययावत राहिले पाहिजे. डिजिटल पत्रकारितेवर रंजक प्रकारे तांत्रिक माहिती देणारी अशा प्रकारची पुस्तके पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात असली पाहिजेत. तंत्रज्ञानाच्या दृष्टीने वर्तमानातील गोष्टी आणि भविष्यातील बदल होतकरू पत्रकारांना कळण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे’, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

स्वप्नील नरके म्हणाले, ‘डिजिटल मार्केटिंगमध्ये सर्च इंजिन ऑप्टिमायझेन, सर्च इंजिन मार्केटिंग या गोष्टी येतात. प्रत्येक व्यवसायाला प्रमोशनसाठी कोणते डिजिटल तंत्र उपयोगी पडेल याचा अचूक अंदाज असला पाहिजे. मात्र, पारंपरिक माध्यमातून प्रमोशन करण्यापेक्षा डिजिटल मीडियातून प्रमोशन करणे व्यवसायाची माहिती सर्वदूर पोहोचविण्यासाठी उपयोगी ठरते. किती ग्राहकांनी ही माहिती पाहिली, वाचली याची माहितीही आपल्याला मिळू शकते. या तंत्रज्ञानाबाबत इंग्रजीत बरेच ज्ञान उपलब्ध असले, तरी मराठीत ते फारसे नव्हते पण या दोन पुस्तकांद्वारे ते मराठीत आले, ही महत्त्वाची गोष्ट आहे.’

लेखक विश्वनाथ गरुड म्हणाले, ‘न्यूज वेबसाइट करताना संकल्पना नावीन्यपूर्ण लागते. केवळ सोशल मिडियावर प्रमोशन करून उपयोग नसतो. Aggregator शी भागीदारी करणेही फारसे फायदेशीर ठरत नाही. गुगलवर वेबसाइट दिसण्यासाठी ऑप्टिमायझेशन केले पाहिजे. त्याबद्दल या पुस्तकात माहिती दिलेली आहे. वाचक मिळविण्यासाठी, न्यूज वेबसाइटद्वारे व्यवसाय मिळविण्यासाठी विविध प्रकारच्या प्रयत्नांची गरज असते, त्यासाठी सर्व तंत्र समजून घेतले पाहिजे. राजकीय पक्षांच्या समर्थनासाठी कार्यरत वेबसाइटमध्ये काम करून फार उपयोग नसतो, कारण या वेबसाइट फार काळ टिकत नाहीत.’सागर गोखले यांनी सूत्रसंचालन केले. आशीष चांदोरकर यांनी आभार मानले.

- Advertisement -

हेही वाचा – गिरीश प्रभुणे यांच्या प्रकरणावर तात्काळ तोडगा काढा – नीलम गोऱ्हे


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -