घरमहाराष्ट्रयुती सेनेसोबत, मविआचं नंतर बघू; प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांकडूनही केली अपेक्षा

युती सेनेसोबत, मविआचं नंतर बघू; प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांकडूनही केली अपेक्षा

Subscribe

मुंबई – शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची आज युतीची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेना पक्ष आधीच महाविकास आघाडीत असताना प्रकाश आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडीने शिवसेनेसोबत युती केली आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीही महाविकास आघाडीत सामील होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, सध्या तरी शिवसेनेसोबत युती झाली आहे. महाविकास आघाडीचं नंतर बघू, असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं. आज शिवसेना-वंचितने घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

हेही वाचा – मोठी बातमी! ठाकरे गट आणि वंचितची युती; पक्षप्रमुखांकडून अधिकृत घोषणा

- Advertisement -

वंचितसोबतची युती आम्ही लगेच केलेली नाही. चर्चेअंती निर्णय घेण्यात आला आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले की, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया मी वाचली आहे. शरद पवारांचं आणि माझं भांडण नवं नाही. आमची जुनी भांडणं आहेत. आमच्यात शेतातली भांडणं नाहीत. आमच्यात मुद्द्यांवरून भांडण आहे. पण शरद पवार आमच्यासोबत येतील, अशी अपेक्षा बाळगतो, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

- Advertisement -

बाळासाहेबांच्या जयंतीनिमित वंचित वहुजन आघाडी आणि शिवसेना यांच्या युतीची घोषणा होऊन यापुढे निवडणुकींमध्ये बदलाचं राजकारण सुरू होईल. जनता दल पक्षाचा जाहीरनामा काढला तर त्यात शेवटचं कॉलम होतं मंडल कमिशन लागू करू. दुर्दैवाने जनता दल मंडल कमिशनभोवतीच पडला अशी परिस्थिती झाली. सामाजिक प्रश्नांना हात घातला जातो तेव्हा समाज व्यवस्थेवरील गणितं बदलतात. उपेक्षितांचं राजकारण याची सुरुवात व्हावी म्हणून आम्ही वंचितची सुरुवात केली. ही चळवळ आम्ही चालवत होतो, त्याला आमच्याच मित्रपक्षाने गिळंकृत करण्याचा किंवा मर्यादित करण्याचा प्रयत्न केल. पण आम्ही डगमगलो नाही, आंदोलन करत राहिलो, लढत राहिलो, असं प्रकाश आंबेडकर यांनी सुरुवातीला म्हटलं.

जिंकून आणण्याचं मतदारांच्या हातात असतं, राजकीय पक्षाच्या हातात नसतं. पण, उमेदवारी देणं राजकीय पक्षाच्या हातात आहे. उमेदवारी देताना त्याच्या स्वरुपाचं सामाजिककरण, सार्वत्रिककरण होईल ही अपेक्षा मी बाळगतो, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

माझ्या एका सर्वेक्षनानुसार, या महाराष्ट्रातील सत्ता ३६९ कुटुंबात होती. आता त्यात १० कुटुंबांची वाढ झाली आहे. महाराष्ट्रात नातेवाईकांचं राजकारण वाढत गेलं. दिशांचं, मुद्द्यांचं, गरिबांचं राजकारण बाजूला पडत गेलं. आणि भांडवालशाहीचं, लुटारूंची सत्ता अशी सुरुवात झाली. त्यामुळे आता, नवीन गोष्टी मांडण्याची गरज आहे. अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या इंडस्ट्रीची गरज होती. ती गरज असताना भागवलीही. पण आज शेतीला जोडधंदा, शेतीची प्रक्रिया उद्योगाची चर्चा करत नाही. काही सेक्टर्स सामान्य माणसाच्या हातामध्ये घेता येतील. भांडवलदार जाणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे. दावोसला जाऊन प्रोजेक्ट आलेले पाहिलेले नाहीत. करारनामे होतात. पण प्रकल्प येत नाहीत, असा घणाघातही आंबेडकरांनी यावेळी केला.

अनेक प्रश्नांवर भूमिका मांडत राहू, चर्चा करत राहू. अपेक्षा एवढीच आहे, शरद पवारांची प्रतिक्रिया वाचली, हे नवीन नाही. आमचं दोघांचं जुनं भाडण आहे. शेतातलं भांडण नाही. नेतृत्त्वातील, विषयाचं भांडण आहे. पण ते आमच्यासोबत येतील अशी अपेक्षा बाळगतो, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

ईडीमार्फत पॉलिकिटल लिडरशीप संपवण्याचा प्रयत्न होतोय. खरंच कोणी पैसे खालले असतील तर कोर्टात जा आणि खटला चालवा. पण, कोर्टात जायचं नाही, असं कसं चालेल? लिडरशीपवर आक्षेप घेतल्याचा भाग, प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोणीही अमरपट्टा घेऊन आलेलो नाही. नरेंद्र मोदी यांच्याही नेतृत्त्वाचाही अंत होणार नाही. त्यांच्या पक्षामध्ये लिडरशीप दुर्दैवाने संपवलेली आहे. कोणालाही वर येऊ दिलेले नाही. बाबासाहेबांनी म्हटलं होतं, आर्थिक परिस्थितीत राजकीय नेतृत्व तयार होत असतं. राष्ट्र हा महत्वाचा आहे. राजकीय नेतृत्त्व तयार झालं पाहिजे. महाराष्ट्र, महाराष्ट्राबाहेर जे जे प्रादेशिक पक्ष आहेत, स्वतःचं लीडकरशीप आणि संघटन उभं करणार असतील तर त्यांना आमचा पाठिंबा असेल, त्यांना हातभार घालू, असंही आंबेडकरांनी स्पष्ट केलं.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -