घरमहाराष्ट्रराज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाला अवघे काही तास शिल्लक, मुख्यमंत्री अनुपस्थित राहणार?

राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाला अवघे काही तास शिल्लक, मुख्यमंत्री अनुपस्थित राहणार?

Subscribe

विशेष म्हणजे राज्य कॅबिनेटच्या बैठकीलाही त्यांनी व्हीसीद्वारे उपस्थिती लावलीय. त्यामुळेच राज्याच्या अधिवेशनाला जवळपास काही तास शिल्लक असतानाच मुख्यमंत्री अनुपस्थित राहण्याची दाट शक्यता आहे. कारण मुख्यमंत्र्यांवर झालेल्या शस्रक्रियेनंतर डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिलाय. त्यामुळे ते अधिवेशनाला उपस्थित राहणार की नाही हे उद्याच समजणार आहे.

मुंबईः राज्याचे विधिमंडळ अधिवेशन काही तासांवर आले आहे. अशाचत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधिमंडळाच्या अधिवेशनात अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथिगृहात सरकारचा चहापानाचा कार्यक्रम होता, त्याला आदित्य ठाकरे, अजित पवार, अशोक चव्हाणांसह इतर नेते उपस्थित होते. परंतु चहापानाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री अनुपस्थित असल्यानं उद्याही मुख्यमंत्री अधिवेशनाला उपस्थित राहणार की नाहीत याबाबत तर्कवितर्कांना उधाण आलंय.

विशेष म्हणजे राज्य कॅबिनेटच्या बैठकीलाही त्यांनी व्हीसीद्वारे उपस्थिती लावलीय. त्यामुळेच राज्याच्या अधिवेशनाला जवळपास काही तास शिल्लक असतानाच मुख्यमंत्री अनुपस्थित राहण्याची दाट शक्यता आहे. कारण मुख्यमंत्र्यांवर झालेल्या शस्रक्रियेनंतर डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिलाय. त्यामुळे ते अधिवेशनाला उपस्थित राहणार की नाही हे उद्याच समजणार आहे.

- Advertisement -

कोरोनाची तिसरी संभाव्य लाट, विधान परिषद निवडणूक आणि मुख्यमंत्र्यांची शस्रक्रिया या कारणास्तव हिवाळी अधिवेशन होणार की नाही याबाबत साशंकता होती, परंतु 22 ते 28 डिसेंबरला अधिवेशन मुंबईत घेण्याचं निश्चित केले असून, उद्यापासून ते अधिवेशन सुरू होणार आहे. पण या अधिवेशनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुपस्थित राहण्याचा कयास बांधला जात आहे.

अधिवेशनात कोणते मुद्दे गाजणार?

हिवाळी अधिवेशनात ओबीसी आरक्षण, पेपर फुटी प्रकरण, परीक्षेला होणार उशीर, मराठा आरक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना, मुख्यमंत्री कारभार, एसटी संप तसेच ईडीच्या कारवाया हे मुद्दे अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे. भाजपचे नेते आणि विरोधक आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

विधानसभा अध्यक्षांची निवड होणार?

विधानसभा अध्यक्षांची जागा रिक्त असून, अद्यापही विधानसभेचे उपाध्यक्षच अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळत आहेत. विशेष म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि पावसाळी अधिवेशन हे अध्यक्षांविनाच पार पडले असून, विनाअध्यक्ष कामकाज पार पडणारं हे तिसरे अधिवेशन आहे. या अधिवेशनात अध्यक्षांची निवड होईल, असे सांगितले जात आहे. संग्राम थोपटे, पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावांची काँग्रेसमध्ये जोरदार चर्चा आहे. पण निवड कोणाची होणार हे लवकरच समजणार आहे.

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -