घरमहाराष्ट्रPrakash Ambedkar : मविआच्या बैठकीत 'वंचित'ने कोणत्या हक्काने यायचे? प्रकाश आंबेडकरांचा सवाल

Prakash Ambedkar : मविआच्या बैठकीत ‘वंचित’ने कोणत्या हक्काने यायचे? प्रकाश आंबेडकरांचा सवाल

Subscribe

वंचितने मविआच्या बैठकीत कोणत्या हक्काने सहभागी व्हायचे? असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला असून याबाबतचा त्यांनी मविआच्या नेत्यांकडे खुलासा देखील मागितला आहे.

अकोला : महाविकास आघाडीमध्ये वंचितला अधिकृत स्थान द्या, अशी मागणी काल (ता. 30 जानेवारी) वंचितचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी केली होती. मविआच्या बैठकीत झालेल्या नाराजी नाट्यानंतर काहीच वेळात मविआने वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना पत्र लिहित वंचितला मविआत अधिकृत स्थान दिले. पण या पत्रानंतर वंचितकडून कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आली नव्हती. ज्यानंतर आज (ता. 31 जानेवारी) प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट केली. वंचितने मविआच्या बैठकीत कोणत्या हक्काने सहभागी व्हायचे? असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला असून याबाबतचा त्यांनी मविआच्या नेत्यांकडे खुलासा देखील मागितला आहे. (With what right should Vanchit Bahujan Aghadi come to MVA meeting? Prakash Ambedkar question)

हेही वाचा… आताची सर्वात मोठी बातमी : ‘वंचित’चा अजून महाविकास आघाडीत समावेश नाही, प्रकाश आंबेडकरांची स्पष्टोक्ती

- Advertisement -

मविआने पाठवलेल्या पत्रावर भूमिका स्पष्ट करण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, माझे म्हणणे आहे की, जे आम्हाला पहिले पत्र आले आहे ते चर्चेच्या निमंत्रणाचे पत्र आले आहे. त्या बैठकीत आम्ही त्यांना सरळ म्हणालो की, आम्ही चर्चा करण्यासाठी आलो आहोत. चर्चा झाली, आम्ही मुद्दे मांडले. पण तुम्ही आम्हाला काही स्पष्टता देत नाही. त्यामुळे बैठक संपली असे आपण समजले पाहिजे. त्यामुळे आम्ही तेव्हा म्हटले की, यापुढे तुमच्याबरोबर आम्ही बैठकीत कोणत्या हक्काने यायचे, याचा खुलासा तुम्ही केला पाहिजे. तुम्ही निमंत्रण म्हणून आम्हाला बोलवणार की घटक पक्ष म्हणून बोलवणार, याचा खुलासा झाला पाहिजे, अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली आहे.

तर, राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट या राज्याचे असल्याने ते निर्णय त्यांच्या राज्यापुरते घेऊ शकतात. पण त्याच बैठकीत निर्णय झाला असे म्हणून काँग्रेसने याबाबत स्पष्टीकरण द्यावे. तसेच, कालच्या बैठकीत वंचितला अपमानास्पद वागणूक मिळालेली असली तरी मविआच्या 2 फेब्रुवारीच्या बैठकीत वंचित सहभागी होणार आहे. याबाबत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आम्हाला तिथे कशी वागणूक मिळाली याचा आम्ही फार बोभाटा करणार नाही. कारण आमचे आधीपासून एकच म्हणणे आहे की आपल्याला देशातून भाजपाचे धोकादायक सरकार उलथून टाकायचे आहे. भाजपाला विरोध म्हणून आम्ही एकत्र येत आहोत. अशा परिस्थितीत आम्ही किंवा इतर कोणीही वैयक्तिक हेवेदावे चर्चेत आणू नये. ‘मी’पणा आणि भाजपा-आरएसएसचे सरकार उलथून टाकणे यापैकी एका गोष्टीला प्राथमिकता द्यायची असेल तर आम्ही भाजपा-आरएसएसचे सरकार उलथून टाकण्याला अधिक महत्त्व देऊ, असेही आंबेडकरांकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -