घरताज्या घडामोडीरत्नागिरी: परवानगी नसतानाही केले उपचार,बीएएमएस डॉक्टरकडून कोरोनाग्रस्त महिलांचा मृत्यू

रत्नागिरी: परवानगी नसतानाही केले उपचार,बीएएमएस डॉक्टरकडून कोरोनाग्रस्त महिलांचा मृत्यू

Subscribe

खेडच्या एसएमएस रुग्णालयात सध्या १५हून अधिक रुग्णांवर कोरोनाचे उपचार केले जात असल्याचे सांगितले जात आहे.

कोरोनाच्या नावाखाली अनेक गैरप्रकार उघडकीस येत आहेत. रत्नागिरीमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रत्नागिरीत प्रशासनाची परवानगी नसतानाही कोविड रुग्णांवर उपचार केले जात होते. रत्नागिरी खेडमधील भरणा येथे एसएमएस रुग्णालयात परवानगी नसतानाही रुग्णालयात उपचार करण्यात आलेल्या दोन महिलांचा दोन दिवसात मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्त महिलांवर बी.ए.एम.एस डॉक्टर उपचार करत होते. कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी एमडी फिजिशयन डॉक्टरची गरज असते. मात्र कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना एसएमएस रुग्णालयात सर्रासपणे बी.ए.एम.एस डॉक्टर कोरोना रुग्णांना उपचार देत होते.

खेडच्या एसएमएस रुग्णालयात सध्या १५हून अधिक रुग्णांवर कोरोनाचे उपचार केले जात असल्याचे सांगितले जात आहे. एसएमएस रुग्णालयाला कोविड सेंटर चालवण्यासाठी कोणतीही अधिकृत परवानगी देण्यात आली नसल्याचे रत्नागिरी जिल्हा कोविड कमांडिंग अधिकाऱ्यांनी सांगितले. असे असतानाही रुग्णालयात कोरोनावर उपचार दिले जात आहेत.

- Advertisement -

त्याचप्रमाणे एसएमएस रुग्णायलात कोरोनावर रुग्णांवर उपचार दिले जात असताना त्या ठिकाणी कोरोनाच्या कोणत्याही नियमांचे पालन न केल्याचे दिसून आले आहे. कोरोना रुग्णांच्या वॉर्डमध्ये इतर लोक आणि रुग्णही फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचप्रमाणे रुग्णालयातील डॉक्टरही कोणत्याही प्रकारची काळजी घेत नाहीत. कोरोना रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर आणि नर्सेस पीपीई किट घालत नाहीत. आयसीयूमध्ये देखिल नातेवाईक सहजपणे वावरतात. विशेष म्हणजे रुग्णालयात कोरोनावर उपचार घेणारे रुग्णांचे नातेवाईक रुग्णांना भेटतात त्यानंतर सार्वजनिक ठिकाणी खुशालपणे फिरताना दिसत आहेत.


हेही वाचा – मराठवाड्यासह, सांगली, कोल्हापूरमध्ये येत्या ३ दिवसात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

- Advertisement -

 

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -