घरक्राइमललित पाटील प्रकरणातील महिला आरोपी आहे मनोरुग्ण, वकिलांनी केली जामीनाची मागणी

ललित पाटील प्रकरणातील महिला आरोपी आहे मनोरुग्ण, वकिलांनी केली जामीनाची मागणी

Subscribe

ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणातील महिला आरोपी प्रज्ञा कांबळे हिच्यावर मानसिक आजाराचे उपचार सुरू आहेत, अशा प्रकारचा दावा तिच्या वकिलांकडून करण्यात आला आहे.

मुंबई : ललित पाटील ड्रग्ज तस्करी प्रकरणी पुणे पोलिसांनी दोन महिलांना अटक केली होती. प्रज्ञा कांबळे आणि अर्चना निकम अशी या दोन महिलांची नावे असून या दोघी ललितच्या मैत्रिणी असल्याची माहिती समोर आली होती. या दोघींना पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत (एनडीपीएस) ‘ससून’मधून चालणाऱ्या तस्करी प्रकरणी अटक केली होती. न्यायालयात हजर केल्यानंतर या दोघींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. परंतु, आता यांतील प्रज्ञा कांबळे ही मनोरुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे तिला जामीन देण्यात यावा, अशी मागणी तिच्या वकिलांकडून करण्यात आली होती. (woman accused in the Lalit Patil case is a psychopath, lawyers have demanded bail)

हेही वाचा – तुरुंगातील चांगल्या व्यवस्थेसाठी ‘अतिरेकी’ असणे गरजेचे; संजय राऊतांचा गौप्यस्फोट

- Advertisement -

ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणातील महिला आरोपी प्रज्ञा कांबळे हिच्यावर मानसिक आजाराचे उपचार सुरू आहेत, अशा प्रकारचा दावा तिच्या वकिलांकडून करण्यात आला आहे. या संदर्भातील वैद्यकीय प्रमाणपत्र तिच्या वकिलांकडून कोर्टात सादर करण्यात आले आहेत. त्यामुळे आरोपी प्रज्ञाला जामीन मंजूर करावा, अशी मागणी तिच्या वकिलांकडून करण्यात आली आहे. प्रज्ञा सध्या पोलीस कोठडीत आहे, त्यामुळे तिच्या जामीनाचा अर्ज हा न्यायालयात दाखल केला आहे.

प्रज्ञा कांबळे हिच्या वकिलांनी दाखल केलेल्या अर्जात तिच्यावर 2019 पासून उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. या अर्जासोबत तिचे वैद्यकीय प्रमाणपत्र जोडण्यात आले आहे. त्यामुळे आता न्यायालय मनोरुग्ण असलेल्या प्रज्ञाबाबत नेमके काय निर्णय घेते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेल्यानंतर ज्या दोन महिला त्याच्या संपर्कात होत्या, त्यातील प्रज्ञा एक होती. तसेच त्याला पळून जाण्यासाठी या दोघींनीच मदत केल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. ललित पाटील फरार असताना तो सातत्याने या दोन मैत्रिणींच्या संपर्कात होता, तसेच त्याने कमावलेला काळा पैसाही त्याने या दोघींकडे ठेवायला दिला होता, अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघड झाली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -