घरताज्या घडामोडीपुण्यातील केईएम हॉस्पिटलच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून महिलेची आत्महत्या

पुण्यातील केईएम हॉस्पिटलच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून महिलेची आत्महत्या

Subscribe

नैराश्यामुळे या महिलेने आत्महत्या केल्याचे समोर येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात आत्महत्येच सत्र सुरूच आहे. आज देखील पुण्यातील हॉस्पिटलमध्ये पाचव्या मजल्यावरून उडून मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. पुण्यातील केईएम हॉस्पिटलमधील ही घटना आहे. यामुळे हॉस्पिटलमध्ये एकच खळबळ उडाली आहे. नैराश्यामुळे या महिलेने आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे.

नक्की काय घडले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या आत्महत्या करणाऱ्या महिलेचं नाव यासना मुकेश बकसानी असं असून ती ३६ वर्षांची होती. पुण्यातील केईएम हॉस्पिटलमध्ये १३ वर्षांच्या तिच्या मुलावर उपचार सुरू होते. त्याला डायबेटिस आणि किडनीच त्रास होता. त्यामुळे त्याच्यावर पुण्यातील केईएम हॉस्पिटलमध्ये कित्येक दिवसांपासून उपचार सुरू होते. तीन महिन्यांपूर्वी कॅन्सरमुळे मृत महिलेच्या पती मुकेश बकसाना याचे निधन झाले होते. सतत येणाऱ्या संकटांमुळे परिस्थितीसमोर हताश झालेल्या यासना यांनी हॉस्पिटलच्या पाचव्या मजल्यावरील खिडकीतून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेचा अधिक तपास पोलीस कर्मचारी करत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – ‘त्या’ तीन साधूंनी महिलेवर एकदा नाही तर सलग सातवेळा केला बलात्कार!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -