Homeक्राइमNashik civil Hospital: जिल्हा रुग्णालयाच्या आवारात महिलेची आत्महत्या

Nashik civil Hospital: जिल्हा रुग्णालयाच्या आवारात महिलेची आत्महत्या

Subscribe

नववर्षाच्या प्रारंभी सातत्याने कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत आलेल्या नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालय (सिव्हिल)च्या आवारात रविवारी (दि.५) दुपारी २ वाजेदरम्यान २५ वर्षीय महिलेने झाडाला ओढणीचा गळफास देत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे जिल्हा रुग्णालय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कवित उमेश अहिवळे (रा. संत कंबीर नगर, भोसला मिलिटरी स्कूलजवळ, गंगापूर रोड, नाशिक) असे मृत महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सुटी असल्याचे जिल्हा रुग्णालयात नेहमीप्रमाणे वर्दळ कमी होती. दुपारी दोन वाजेदरम्यान निर्मनुष्य ठिकाण असलेल्या आरोग्य अभियानाच्या कार्यालयासमोरील झाडाझुडपामध्ये एका महिलेने गळफास घेतल्याचे समोर आले. ही बाब सुरक्षारक्षक, परिचारिका, डॉक्टरांना समजताच सर्वांनी घटनास्थळी धाव घेतली. जिल्हा रुग्णालय पोलीस चौकीतील पोलिसांनीही घटनास्थळी येत सरकारवाडा पोलिसांना एका महिलेने आत्महत्या केल्याचे सांगितले. त्यानंतर सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पोलीसही घटनास्थळी आले. पोलिसांकडून पंचनाम्याचे काम सुरु आहे.

मृत महिलेला चार मुली, एका मुलीवर रुग्णालयात सुरु होते उपचार

मृत कविता अहिवळे हिला चार मुली आहेत. ती भंगार गोळा करण्याचे काम करते. तिची तिसरी मुलगी अशक्तपणामुळे आजारी होती. त्या मुलीवर जिल्हा रुग्णालयात कुपोषित विभागात उपचार सुरु होते. रविवारी सकाळी ती मुलीला घेऊन बाहेर गेली होती. ती दुपारी गळफास घेतलेल्या अवस्थेत रुग्णालयाच्या आवारात आढळून आली.