घरमहाराष्ट्रसिंधुदुर्गातील कारिवडे धरणात मगरीच्या हल्ल्याच महिलेचा मृत्यू

सिंधुदुर्गातील कारिवडे धरणात मगरीच्या हल्ल्याच महिलेचा मृत्यू

Subscribe

कपडे धुण्यासाठी गेलेल्या एका महिलेवर मगरीने हल्ला केल्याने महिलाचे दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सिंधुदुर्गातील कारिवडे धरणात घडली आहे. लक्ष्मी बाबली मेस्त्री (60) असे या मृत महिलेचे नाव आहे. लक्ष्मी या गुरुवारी दुपारी कारिवडे धरण पात्रात गेल्या होत्या, मात्र सायंकाळी उशीरापर्यंत त्या घरी आल्याच नाहीत. यावेळी मेस्त्री कुटुंबियांसह वाडीतील ग्रामस्थांनी त्याचा शोध घेतला, परंतु त्या कुठेच सापडल्या नाहीत. दरम्यान शुक्रवारी सकाळी धरणातील पात्रात एक मृतदेह तरंगत असल्याचे कपजे धुण्यासाठी केलेल्या महिला आणि गुराख्यांना दिसला.

या घटनेची माहिती तात्काळ पोलीस आणि वनखात्याला देण्यात आली. यानंतर सावंतवाडी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. यानंतर स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने मृतदेह पाण्याबाहेर काढत वन आणि पोलीस खात्याने घटनेचा पंचनामा केला. पोस्टमार्टमसाठी मृतदेह सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला.

- Advertisement -

या घटनेनंतर पोलीस पाटील प्रदीप केळूसकर, वनविभागाचे वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर, वनपाल प्रमोद सावंत आणि त्यांचे सहकारी, यासोबत सरपंच अपर्णा तळवणेकर यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

यावेळी मगरीच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. कारण मगरीने या महिलेच्या अंगाचा काही भाग मगरीने फस्त केला होता. तसेच सकाळीही या महिलेच्या मृतदेहाशेजारी मगरींचा वावर असल्याचे ग्रामस्थांनी पाहिले. मृत महिलेच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.


गुजरातमध्ये आमचा खऱ्या अर्थाने विजय आणि भाजपाची हार, सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -