घरमहाराष्ट्रशारीरिक संबंध न ठेवणाऱ्या पती विरोधात पोलिसांत तक्रार दाखल

शारीरिक संबंध न ठेवणाऱ्या पती विरोधात पोलिसांत तक्रार दाखल

Subscribe

पत्नीसोबत शारीरिक संबंध न ठेवणाऱ्या पती विरोधात पत्नीनं पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्याशिवाय शिवीगाळ, मारहाण, मानसिक आणि शारीरिक छळ देखील केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. या घटनेप्रकरणी ३३ वर्षीय पती विरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. संबंधित घटना फेब्रुवारी ते सप्टेंबर दरम्यान घडली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ वर्षीय फिर्यादी यांचे फेब्रुवारी महिन्यात धुमधडाक्यात विवाह लावून देण्यात आलं होतं. फिर्यादी यांच्या वडिलांनी लग्नावर तब्बल २० लाख रुपये खर्च केले होते. परंतु, विवाह झाल्यानंतर आरोपी पतीने दिलेली आश्वासन पाळले नाहीत. विवाह कराताना ते खोटे बोलले होते. त्यांनी आतापर्यंत एकही जबाबदारी पार पडली नसल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. दरम्यान, फिर्यादी या नववधू होऊन त्या सासरी आल्यानंतर त्यांच्या सोबत पतीने कधीच शारीरिक संबंध ठेवले नाहीत. शिवाय फ्लॅट घेण्यासाठी आई वडिलांकडून दहा लाख रुपये घेऊन ये असे म्हणून शिवीगाळ, मारहाण, शारीरिक आणि मानसिक छळ तसेच आर्थिक त्रास दिल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. पती आपल्या पत्नीला नांदवण्यास तयार नाही त्यामुळे त्यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार चिखली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -