घरठाणेठाण्यात खोदलेल्या खड्ड्यात पडून महिला जखमी

ठाण्यात खोदलेल्या खड्ड्यात पडून महिला जखमी

Subscribe

ठाणे । रस्ता दुरुस्तीसाठी खोदून ठेवलेल्या खड्ड्यात कुमोदीनी रोशन फिरके (38) या महिला पडून किरकोळ जखमी झाल्याची घटना शुक्रवारी समोर आली. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास वागळे इस्टेट, रोड क्रमांक 33 येथे घडली. खोदून ठेवलेल्या रस्त्याला बॅरिगेटिंग केले नसल्याने ही घडली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.

वागळे इस्टेट, या ठिकाणी कामगार हॉस्पिटल ते इंदिरा नगर नाक्यापर्यंत रस्ता दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्या कामासाठी रस्ता खोदण्यात आला असून त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे बॅरिगेटिंग करण्यात आलेली नाही. तसेच,ज्येष्ठ नागरिकांसाठी पर्यायी रस्त्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास कुमोदीनी नामक महिला त्या रस्त्याने जात असताना खोदून ठेवलेल्या खड्ड्यामध्ये पडल्या.

- Advertisement -

घटनेत त्यांच्या उजव्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच याबाबत शुक्रवारी सकाळी रोहन फिरके यांनी ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षेला माहिती दिल्यावर ही घटना समोर आली. सदर तक्रारीची संबंधित विभागाने नोंद घेऊन लवकरात लवकर कार्यवाही करावी. असेही आपत्ती व्यवस्थापन कक्षमार्फत सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -