घरताज्या घडामोडीधक्कादायक : परपुरुषांशी वारंवार अनैतिक संबंध; 10 लाखांची सुपारी देत पतीने केला...

धक्कादायक : परपुरुषांशी वारंवार अनैतिक संबंध; 10 लाखांची सुपारी देत पतीने केला पत्नीचा खून 

Subscribe
 परपुरुषांशी पत्नी वारंवार अनैतिक संबंध ठेवत असल्याच्या त्रासाला कंटाळून व समजून सांगूनही तिच्यात फरक पडत नसल्याने पतीने मित्राच्या मदतीने एकाला 10 लाख रुपयांची सुपारी देत तिचा खून केला. ही घटना 14 जून रोजी मुंबई-आग्रा महामार्गावरील राहुड घाटात घडली. याप्रकरणी पोलिसांनी पती, त्याच्या मित्रासह सुपारी घेणाऱ्यास अटक केली आहे. पती नीता नारायण चित्ते (39, रा. म्हसरूळ) असे मृत महिलेचे नाव आहे. पती नारायण चित्ते (४९, रा. म्हसरूळ), मित्र विनय निंबाजी वाघ (52, रा.गुलमोहरनगर, म्हसरूळ), भरत देवचंद मोची ऊर्फ मोरे (28, रा. भीमनगर, उल्हासनगर, जि.ठाणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
16 जून रोजी चांदवड पोलीस ठाणे हद्दीतील राहुड घाट परिसरात मुंबई-आग्रा महामार्गावर रोडलगत नाल्यात अनोळखी मृतदेह पोलिसांना आढळून आला. याप्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपास सुरू केला. दरम्यान, नाशिक शहरातील अंबड पोलीस ठाण्यात महिला बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाली असल्याची माहिती पथकास मिळाली. तपासात बेपत्ता व मृत महिलेचे नाव नीता चित्ते असल्याचे समोर आले. 14 जून रोजी महिला माहेरी उत्तमनगर, सिडको येथे आली होती. त्याच दिवशी ती के.के. वाघ कॉलेज परिसरातून कारमधून दुसऱ्या ठिकाणी गेल्याचे समजले.
पोलिसांनी महिलेचा पती नारायण चित्ते यांच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पत्नी अनेक पुरुषांशी वारंवार अनैतिक संबंध ठेवत होती. तिच्या त्रासाला कंटाळून गेलो होतो, तिला वेळोवेळी समजावून सांगितले तरी तिच्यात काहीच फरक पडला नाही. मित्र विनय वाघ याच्या मदतीने नारायण चित्ते यांनी पत्नीला ठार मारण्यासाठी 10 लाख रुपयांची सुपारी भरत मोरे यास दिली.  मोरे याने 14 जून रोजी रात्री साथीदार वाहिद अली शराफत अली याच्यासह महिलेस के.के.वाघ कॉलेजसमोरून कारमध्ये घेतले. राहुड घाट परिसरात महिलेचा साडीने गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह रोडच्या कडेला फेकून दिला.
विलहोळी येथे 15 जून रोजी भरत मोरे याने विनय वाघ याच्याकडून 5 लाख रुपये घेतले. उर्वरित रक्कम नंतर आणून दे असे सांगून ते उल्हासनगर येथे निघून गेले. पोलिसांनी विनय वाघ यास म्हसरूळ येथून आणि उल्हासनगर येथून भरत मोरे यास अटक केली आहे.
Sushant Kirve
Sushant Kirvehttps://www.mymahanagar.com/author/ksushant/
गेल्या १२ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. क्राईम, आरोग्य, साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर लिखाण. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी आणि जीवघेण्या अपघातांमध्ये घट होण्यासाठी सातत्याने लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -