घरठाणेशिंदेंच्या फोटोला विरोध केल्याप्रकरणी महिला संघटकावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल

शिंदेंच्या फोटोला विरोध केल्याप्रकरणी महिला संघटकावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल

Subscribe

शिंदे समर्थकांना विरोध करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात महिला विधानसभा संघटक कविता गावंड यांनी शिवीगाळ केली होती. या प्रकरणी महिला संघटकावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदेंच्या डोंबिवली मध्यवर्ती शाखेतील कार्यालयातून हटवलेले फोटो पुन्हा लावण्यासाठी शिंदे समर्थकांनी कार्यालयात धक्काबुक्की करत गोंधळ घातला होता. यावेळी शाखेत शिंदे समर्थकांना विरोध करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात महिला विधानसभा संघटक कविता गावंड यांनी शिवीगाळ केली होती. या प्रकरणी पोलिसांनी कविता गावंड यांच्या विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.

डोंबिवली मध्यवर्ती शाखेतच खासदार डॉ शिंदे यांचे कार्यालय आहे. मात्र, शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे समर्थक शिवसैनिकांनी खासदारांच्या कार्यालयातील शिंदे पिता-पुत्राचे फोटो हटवले होते. तसेच शिंदे समर्थकांना शाखेत येण्यास प्रतिबंध केला होता. मात्र, मगंळवारी शिंदे समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येने शाखेत शिरले. त्यांनी शिंदे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली आणि शिंदे यांचे हटवलेले फोटो पुन्हा भिंतीवर लावले. यावेळी शाखेत उपस्थित असलेल्या ठाकरे समर्थक आणि शिंदे समर्थकांमध्ये धक्काबुक्की आणि हाणामारी झाली होती.

- Advertisement -

राजद्रोहाचा गुन्हा –

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदेंच्या डोंबिवली मध्यवर्ती शाखेतील कार्यालयातून हटवलेले फोटो पुन्हा लावण्यासाठी शिंदे समर्थकांनी कार्यालयात धक्काबुक्की करत गोंधळ घातला होता. या प्रकरणात एकनाथ शिंदे यांच्याविरोधात शिवीगाळ करणाऱ्या महिला विधानसभा संघटक कविता गावंड यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -