घरमहाराष्ट्रभास्कर जाधवांनी अरेरावी केलेली नाही, आमचे घरगुती संबंध; ‘त्या’ महिलेची प्रतिक्रिया

भास्कर जाधवांनी अरेरावी केलेली नाही, आमचे घरगुती संबंध; ‘त्या’ महिलेची प्रतिक्रिया

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या रविवारच्या चिपळूण दौऱ्यावेळी एक महिला नुकसान भरपाईची विनवणी करत होती. यावेळी शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी त्या महिलेसोबत अरेरावी केल्याचा आरोप केला जात आहे. यावरुन विरोधकांनी देखील भास्कर जाधव यांच्यावर टीकेचे बाण सोडले आहेत. दरम्यान, आता त्या महिलेने या प्रकारावर प्रतिक्रिया दिली आहे. भास्कर जाधव यांनी अरेरावी केलेली नाही, त्यांचा आवाजच तसा आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

ज्या महिलेसोबत भास्कर जाधव यांनी अरेरावी केल्याचा आरोप केला जात आहे त्या महिलेचं स्वाती भोजने असं नाव आहे. त्यांनी आज माध्यमांशी प्रतिक्रिया दिली. “गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचे आणि आमचे घरगुती संबंध आहेत. त्यांनी माझ्या मुलाला वडीलकीच्या नात्याने सांगितलं. मी खूप भावूक झाले होते. आमच्याकडे मोबाईलला रेंज नाही, टीव्ही दिसत नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल काय बोललं जातं हे अद्याप माहिती नाही. त्यांचा आवाजच तसा आहे. त्यांनी अरेरावी केली नाही. त्यामुळे नेहमीप्रमाणे ते हातवारे करत बोलत होते. त्यामुळे लोकांना गैरसमज झाला,” अशी प्रतिक्रिया त्या महिलेने दिली आहे.

- Advertisement -

भास्कर जाधवांनी दिली प्रतिक्रिया

“मला यावर काहीच बोलायचं नाही. लोकांना मदत करणं हाच माझा प्राथमिक हेतू आहे. कालही मला लोकांना मदत करायची होती. ती महिला माझ्या मुलीसारखी होती. तिच्यासोबत किंवा माझ्या नातू किंवा भाचासारख्या असणाऱ्या मुलासोबतही मी बोलायचं नाही आणि ते सुद्धा कोणत्यातरी चॅनेलच्या प्रतिनिधीला विचारुन बोलायचं असेल तर काम करणं कठीण आहे. पण ज्यांनी मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला त्याच्यावरच सोशल मीडियावर लोक तुटून पडले आहेत,” असं भास्कर जाधव म्हणाले. ते एबीपी माझाशी बोलत होते.

भास्कर जाधव यांनी पुढे बोलताना टीकाकारांना आज आम्ही रस्ता साफ करत असून टीका करणारे कुठे आहेत अशी विचारणा केली. आपण त्यांना फार महत्व देत नाही. जे कोणी हे घडवलं आहे त्याला योग्य वेळेला उत्तर देईन, असा इशारा भास्कर जाधव यांनी दिला.

- Advertisement -

हेही वाचा – महिलेला केलेल्या दमदाटीवरुन वाद, भास्कर जाधवांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -