घरCORONA UPDATEनगर जिल्ह्यात ओमायक्रॉनचा शिरकाव

नगर जिल्ह्यात ओमायक्रॉनचा शिरकाव

Subscribe

नायजेरियातून श्रीरामपूरला आलेली महिला कोरोनाबाधित

अहमदनगर : राज्यात दिवसेंदिवस ओमायक्रॉनचा धोका वाढत असून आता नाशिक जिल्ह्याला लागून असलेल्या नगर जिल्ह्यात ओमायक्रॉनचा शिरकाव झाल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. गेल्या आठवड्यात नायजेरियातून श्रीरामपूरला आलेल्या ४१ वर्षीय महिलेला ओमिक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात आले.

गेल्या आठवड्यात ४१ वर्षीय आई आणि सहा वर्षांचा मुलगा नायजेरियातून श्रीरामपूरला परतले होते. त्यांची माहिती मिळाल्यानंतर आरोग्य विभागाने त्यांची चाचणी केली. तेव्हा त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांच्या स्वॅबचे नमुने ओमिक्रॉनसंबंधीच्या चाचणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला. त्यानुसार यातील महिलेला ओमिक्रॉनची लागण झाल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. या महिलेसह तिच्या लहान मुलाचीही प्रकृती ठीक असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -