घरट्रेंडिंगमहाराष्ट्रात पुरूषांपेक्षा महिलांचे स्थलांतर वाढले

महाराष्ट्रात पुरूषांपेक्षा महिलांचे स्थलांतर वाढले

Subscribe

गेल्या तीन दशकांच्या कालावधीत इतर राज्यातून आलेले स्थलांतरीत हे प्रामुख्याने मुंबई उपनगर, ठाणे, पुणे आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये आढळले आहेत.

स्थलांतराच्या मुद्द्यावर मुंबई, पुणे, नाशिक यासारख्या शहराच्या पायाभूत सुविधांचा ताण दिवसेंदिवस वाढतो आहेच. पण राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातून एक वेगळाच ट्रेंड पहायला मिळाला आहे. पूर्वीच्या ट्रेंडनुसार आता फक्त एक व्यक्ती व्यवसाय किंवा रोजगारासाठी स्थलांतर करत नाही. तर संपुर्ण कुटुंबच्या कुटुंबच स्थलांतर करत असल्याचे आर्थिक पाहणी अहवालातून दिसून आले आहे. महाराष्ट्रात जेव्हा संपुर्ण कुटुंब स्थलांतर करते तेव्हा पुरूषांपेक्षा महिलांचे स्थलांतराचे प्रमाण अधिक असल्याचा निष्कर्ष अहवालातून समोर आला आहे. भारत सरकारच्या महानिबंधक कार्यालयाचा आधार घेत हे आर्थिक पाहणी अहवालाचे आकडे समोर आले आहेत. गेल्या तीन दशकांच्या कालावधीत इतर राज्यातून आलेले स्थलांतरीत हे प्रामुख्याने मुंबई उपनगर, ठाणे, पुणे आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये आढळले आहेत.

कुटुंबासोबत स्थान बदल हे स्थलांतरासाठीचे प्रमुख कारणे ठरले आहे. विवाह, कामकाज किंवा रोजगाराच्या निमित्तानेही लोक स्थलांतर करण्याचा ट्रेंड महाराष्ट्रात दिसून आलेला आहे. महाराष्ट्रात जिल्ह्याअंतर्गत स्थलांतरासाठी विवाह हे सर्वात मोठे कारण ठरले आहे. राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातूनच ही बाब समोर आली आहे. त्यापाठोपाठ कुटुंबासमवेत स्थान बदल आणि जन्मानंतर स्थान बदल या कारणांचा क्रम लागतो. विवाह आणि कुटुंबांसोबत स्थलांतरासाठी स्थान बदल करण्यासाठी जिल्ह्याअंतर्गत आणि आंतरजिल्हा या प्रकारांमध्ये स्त्रियांचे पुरूषांच्या स्थलांतरापेक्षा प्रमाण जास्त आहे.

- Advertisement -

जनगणना २०११ नुसार मागील वास्तव्याच्या ठिकाणानुसार सुमारे ९४.०७ लाख व्यक्तींनी जिल्ह्यातील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर केले. तर सुमारे ७२.६७ लाख व्यक्तींनी राज्याच्या एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात स्थलांतर केले आहे. इतर राज्यांमधील ३८.१३ लाख व्यक्तींनी आणि इतर देशातील सुमारे १.२० लाख व्यक्तींनी राज्यात स्थलांतर केल्याची आकडेवारी आर्थिक पाहणी अहवालात नमुद करण्यात आली आहे. राज्यात स्थलांतरीत झालेल्यांची एकुण संख्या सुमारे ३९.३३ लाख असून राज्यातून इतर राज्यात स्थलांतरी झालेल्यांची संख्या १२.५२ लाख इतकी आहे.

असा आहे स्थलांतराचा ट्रेंड (लाखात)

- Advertisement -

स्थलांतराचा प्रकार    १९९१     २००१      २०११
जिल्ह्याअंतर्गत        ४८.६५   ७४.५१    ९४.०७
इतर राज्यातून        १६.१३    ३२.६२     ३८.१३
इतर देशातून         ०.३०      ०.४८      १.२०
राज्याबाहेर गेलेले    ७.७०     ८.९७      १२.५२

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -