घरमहाराष्ट्रपनवेलमध्ये पार पडलेल्या स्वच्छता उत्सवात महिलांनी घेतला सहभाग

पनवेलमध्ये पार पडलेल्या स्वच्छता उत्सवात महिलांनी घेतला सहभाग

Subscribe

पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग समिती 'क', कामोठे विभागाच्यावतीने स्वच्छता उत्सव २०२३ चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पनवेलमधील २२५ महिलांनी सहभाग घेतला होता.

पनवेल महानगरपालिका प्रभाग समिती – क, कामोठे विभाग यांच्या मार्फत आज शुक्रवारी (ता. ३१ मार्च) स्वच्छता उत्सव २०२३ चे आयोजन करण्यात आले होते. सका‌ळी ७.३० पासून हे अभियान राबविण्यात आले. या मोहिमेचा मुख्य उद्देश महिलांचा स्वच्छतेमधील सहभाग तसेच महिलांच्या नेतृत्वाखाली स्वच्छतेमध्ये झालेले बदल साजरे करणे होता.

या अभियानात पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील आशा सेविका, प्राथमिक आरोग्य परिचारिका, सर्व शाळा, कॉलेज, एनजीओ, महिला बचत गट तसेच आदिवासी विकास परिषद, दिशा महिला मंच, संस्कार महिला संस्था, सरस्वती महिला बचत गट, M.G.M मेडिकल कालेज, रॉबिनहुड आर्मी, प्राथमिक आरोग्य केंद्र कमोठे आणि आशा स्वयं सेविका या देखील सहभागी झाल्या होत्या.

- Advertisement -

हेही वाचा – धक्कादायक! दिल्लीतील शास्त्री पार्कमधील एकाच घरात सापडले 6 मृतदेह

या अभियानाच्या माध्यमातून स्वच्छतेच्या बाबत व्यापक जनजागृती करून रॅलीच्या माध्यमातून संदेश देण्यात आला. सदर अभियानामध्ये महिला बचत गटाचे २० स्टॉल लावण्यात आले होते. या अभियानात अंदाजे २२५ महिला उपस्थित होत्या. याप्रसंगी पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त गणेश शेटे तसेच लेखा अधिकारी संग्राम व्होरकाटे यांच्या मार्फत सर्व महिला स्वच्छता कॅप्टन यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

- Advertisement -

तसेच, या कार्यक्रमाला प्रभाग समिती क चे प्रभाग अधिकारी अरविंद पाटील, आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड, आरोग्य विभाग इंजिनिअर चिन्मय सापने, स्वच्छता निरीक्षक योगेश कस्तूरे, ऋषिकेश गायकवाड, आतुल वास्कर, मिथुन पवार व सर्व पर्यवेक्षक, आणि स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.


हेही वाचा – पती भीक मागत असला तरी पत्नीला पोटगी द्यावीच लागेल; पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाचा निर्वाळा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -