Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र महिला पोलीस कर्मचाऱ्यानेच दिली सहकारी पोलिसाच्या हत्येची सुपारी

महिला पोलीस कर्मचाऱ्यानेच दिली सहकारी पोलिसाच्या हत्येची सुपारी

पनवेलमध्ये किरकोळ वादातून घडली घटना, तीन आरोपींना अटक

Related Story

- Advertisement -

पनवेल रेल्वे स्टेशन ते मालधक्का रस्त्यावर भगत चाळीसमोर काही दिवसांपूर्वी पोलीस कर्मचारी शिवाजी माधवराव सानप (वय ५४) यांचा अपघाती मृत्यू झाला होता. हा अपघात सानप यांच्याच सहकारी असलेल्या एका महिला पोलीसाने सुपारी देऊन घडवून आणल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात उघड झालीय. याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतलंय.

अपघाती मृत्यूबाबत शिवाजी माधवराव सानप यांच्या कुटुंबियांनी संशय व्यक्त केला होता. घटनास्थळावरील संशयास्पद हालचालींवरुन पोलिसांनी आरोपींची चौकशी केली तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पनवेल रेल्वे स्टेशन ते मालधक्का जाणार्‍या रस्त्यावर भगत चाळीसमोर काही दिवसांपूर्वी माधवराव सानप यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

- Advertisement -

नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह, सह पोलीस आयुक्त डॉ. जय जाधव, पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहायक पोलीस आयुक्त भागवत सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली. त्यात हत्या करून अपघाती मृत्यू दाखवल्याची बाब उघडकीस आली.

पोलिसांच्या सखोल तपासाला यश

घटनास्थळावरील पुरावे, सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल फोन, कॉल्स अशा विविध पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी अत्यंत कुशलतेने तपास सुरू केला. यासोबतच सानप यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीच्या आधारे समांतर तपास सुरू होते. यातून पोलिस आरोपींपर्यंत पोहोचले. त्यानंतर घटनेचा उलगडा झाला.

अशी केली हत्या

- Advertisement -

शिवाजी सानप हे रेल्वे स्थानकात उतरुन पायी निघाले होते. याचवेळी आरोपी विशाल जाधव व गणेश चव्हाण उर्फ मुदावथ याने आपल्या ताब्यात असलेल्या नॅनो कारने सानप यांना जोरदार धडक दिली. ही कारही पोलिसांनी हस्तगत केलीय. सानप ज्या पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते त्या ठिकाणी महिला पोलीस शिपाई शितल पानसरे यादेखील कार्यरत होत्या. सानप आणि पानसरे यांच्यात किरकोळ वाद झाला होता. मात्र, त्याचा राग मनात धरून शीतल पानसरे यांनी स्वतःचे घरकाम करणारा विशाल जाधव व त्याचा मित्र गणेश चव्हाण यांना पैसे देऊन ही हत्या घडवून आणली.

- Advertisement -