घरताज्या घडामोडी महिलांची ऑफिसनजीक घराला पसंती, तर पुरूषांची बजेटला

 महिलांची ऑफिसनजीक घराला पसंती, तर पुरूषांची बजेटला

Subscribe

घर खरेदीसाठी मुंबई महानगर क्षेत्रासाठी महिलांनी सर्वाधिक पसंती दिली आहे.

जेव्हा घर खरेदीचा विषय येतो, तेव्हा महिला या पुरूषांपेक्षा अधिक गांभीर्याने या गोष्टीचा विचार करता. महिला या घर खरेदीमध्ये पुरूषांपेक्षाही आघाडीवर आहेत असे एका सर्वेक्षणाच्या माध्यमातून समोर आले आहे. त्यामुळेच भारतातील घरासाठीचे रिअल इस्टेट मार्केटवरही महिलांची मक्तेदारी वाढल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. सरासरी  ७७ टक्के महिलांकडूनच घर खरेदीचा निर्णय़ घेतला जातो. हे घर राहण्यासाठीच घ्यायचे याच उद्देशाने महिलांकडून या घराची खरेदी होते. तर २३ टक्के महिला घर खरेदी ही फक्त गुंतवणुक म्हणून करतात. अनॅरॉक एलआयसी हाऊसिंग फायनान्स कंझ्युमर सेन्टीमेंट सर्व्हेच्या माध्यमातून ही बाब समोर आली आहे. तुलनेत पुरूषांमध्ये ६६ टक्के पुरूष घर खरेदी प्रत्यक्ष राहण्यासाठी तर उर्वरीत ३८ टक्के घराची खरेदी गुंतवणुकीसाठी करतात. जवळपास ८७ टक्के महिलांसाठी ही पहिल्या घरासाठीची गुंतवणुक असते.

गेल्या काही वर्षात घर खरेदीमध्ये महिलांची मक्तेदारी पहायला मिळाल आहे. त्यामध्ये कामाच्या ठिकाणापासून नजीकचे ठिकाण हा महत्वाचा मुद्दा घर खरेदीमध्ये असतो. तर ३५ टक्के महिलांनी पुरक अशा सोयीसुविधा राहत्या घराच्या ठिकाणी असाव्यात यासाठी प्राधान्य दिले आहे. पुरूषांमध्ये घर खरेदी करण्याची क्षमता या गोष्टीची चाचपणी केली जाते. म्हणूनच पुरूषांपेक्षा महिलांची मक्तेदारी घर खरेदीत अग्रस्थानी आहेत असे सर्वेक्षणात आढळले आहे. सरासरी ४७ टक्के घर खरेदी करणाऱ्या महिलांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी ५ टक्के महिला या २५ वयोगटाच्या आतीलच होत्या. तर पुरूषांमध्ये ४७ टक्के घर खरेदी करणारे हे ३५ ते ४५ वयोगटा दरम्यानचे आहेत.

- Advertisement -

मुंबई महानगर क्षेत्राला सर्वाधिक पसंती

महिलांनी घर खरेदी करण्यासाठी सर्वाधिक पसंती ही मुंबई महानगर क्षेत्राला दिली आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या महिलांपैकी २६ टक्के महिलांनी मुंबई महानगर क्षेत्रासाठी पसंती दिली आहे. जवळपास २२ टक्के महिलांची पसंती ही दिल्ली शहराला आहे. तर २० टक्के महिलांनी बंगळुरूला पसंती दिली आहे. तर पुण्याला १२ टक्के इतकी पसंती आहे. कोलकाता, चेन्नई आणि हैद्राबादला त्यापाठोपाठ पसंती आहे.

आरामदायी २ बीएचकेसाठी पसंती

महिलांनी आरामदायी २ बीएचके घरासाठी अधिक पसंती दिली आहे. जवळपास ५० टक्के महिलांनी ८०० चौरस फुट ते १२०० चौरस फुटाचे घर खदेरीला पसंती दिली आहे. तर मुंबईसारख्या छोट्या शहरात २ बीएचके घर किमान ६०० चौरस फुटाचे असावे अशी अपेक्षा केली आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -