घरमहाराष्ट्रWomen Reservation Bill : काही पुरुष नेते निवडून न येण्यासाठी विधेयक...

Women Reservation Bill : काही पुरुष नेते निवडून न येण्यासाठी विधेयक आणलं असावं; राऊतांची खोचक टीका

Subscribe

नव्या संसदेत पहिलंच आणि ऐतिहासिक विधेयक मंजूर झाल्यानं देशभर जल्लोष आहे. यावर अनेक पक्षाच्या नेत्यांनी आपल्या भूमिका मांडल्या आहेत. यावरच बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक खोचक टीका भाजपवर केली आहे. काही पुरुष नेते सत्ताधाऱ्यांना सभागृहात नको आहेत, आणि म्हणून त्यांच्या जागी महिलांना उमेदवारी दिली जाऊ शकते, असा आरोप करत त्यांनी उपरोधिक टीका केली आहे.

महिला आरक्षण विधेयकावर तब्बल सात तास चर्चा झाल्यानंतर हे विधेयक मंजूर करण्यात आलं. त्यामुळे आता महिलांना सत्तेत 33 टक्के भागीदारी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नव्या संसदेत पहिलंच आणि ऐतिहासिक विधेयक मंजूर झाल्यानं देशभर जल्लोष आहे. यावर अनेक पक्षाच्या नेत्यांनी आपल्या भूमिका मांडल्या आहेत. यावरच बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक खोचक टीका भाजपवर केली आहे. काही पुरुष नेते सत्ताधाऱ्यांना सभागृहात नको आहेत, आणि म्हणून त्यांच्या जागी महिलांना उमेदवारी दिली जाऊ शकते, असा आरोप करत त्यांनी उपरोधिक टीका केली आहे. (Women Reservation Bill Bill should have been introduced to prevent some male leaders from being elected Sanjay Raut s criticism to BJP and Modi Government )

वायनाड महिला आरक्षित झाला तर तुम्ही आमच्यावर

लोकसभेत आणि विधानसभेत महिलांची संख्या वाढवून महिलांचं सबलीकरण होणार नाही. प्रश्न महिलांना प्रतिष्ठा आणि सन्मा देण्याचा आहे. देशातील राष्ट्रपती पदावर असलेल्या महिलेला जर सन्मान मिळत नसेल तर तुम्ही महिला खासदार आणि आमदारांच्या संख्या वाढवून महिलांच्याबाबतीत काय साध्य करणार आहात हा प्रश्न देशाच्या मनात आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन का केलं नाही? यावर भाजपनं उत्तर द्यावं, असं राऊत म्हणाले.

- Advertisement -

एमआयएम पक्षानं विरोधात मतदान केलं का? असा प्रश्न राऊतांना विचारला असता ते म्हणाले की, महिला आरक्षण बिलाबाबत प्रत्येक पक्षानं आपली वेगळी अशी एक भूमिका मांडली आहे. समाजवादी पार्टी, आरजेडी असेल या पक्षांनी या विधेयकावर प्रत्येकवेळी वेगळी भूमिका मांडली आहे. त्यामुळे एमआयएमने या विधेयकाबाबत विरोधात मतदान केलेलं असू शकतं.

पुरुष नेते निवडून न येण्यासाठी हे विधेयक

संजय राऊत म्हणाले की, अमित शाह काल खोचकपणे म्हणाले की, उद्या जर का वायनाडची सीट महिला आरक्षित झाली तर त्याचाही आरोप तुम्ही आमच्यावर कराल. पण ते खरंच आहे. ते काहीही करु शकतात. त्यांच्या हातात निवडणूक आयोग आहे, असा आरोप राऊतांनी केला आहे. राऊत म्हणाले की, विधिमंडळात असलेले अनेक पुरुष नेते पुन्हा सभागृहात दिसू नयेत, म्हणूनही हे विधेयक घाईघाईत भाजपनं आणलं असावं, अशी उपरोधिक टीकाही राऊतांनी केली आहे.

- Advertisement -

(हेही वाचा: …असले प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत, अंबादास दानवेंचा थेट इशारा )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -