महिला सुरक्षा हाच शिंदे-फडणवीस सरकारचा अजेंडा : चित्रा वाघ

भारतीय जनता पार्टी जगातील सर्वात मोठा पक्ष आहे त्याचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. त्यांनी महिलांसाठी पारित केलेल्या योजना घरघरात पोहचविण्याचे अवाहन चित्रा वाघ यांनी केले.

महाविकास आघाडीच्या काळात महिलांवरील आत्याचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत.अन्यायाविरूध्द आम्ही आवाज उठविला असता आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. सध्याचे शिंदे-फडणवीसांचे सरकार आहे त्यामुळे मुली आणि महिलांकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्याची गय केली जाणार नाही असा इशारा महीला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी खोपोलीतील सभेत बोलताना दिला असून महीला सुरक्षा हाच या सरकारचा अजेंडा असल्याचे सांगत भारतीय जनता पार्टी जगातील सर्वात मोठा पक्ष आहे त्याचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. त्यांनी महिलांसाठी पारित केलेल्या योजना घरघरात पोहचविण्याचे अवाहन चित्रा वाघ यांनी केले.

रायगड जिल्हा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा अश्विनी पाटील यांच्या आयोजनातून उत्तर रायगड जिल्हा महिला मेळावा लोहना समाज सभागृहात आयोजित करण्यात आलेला याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक नवनिर्वाचित महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ,रायगड जिल्हाध्यक्ष प्रशांतदादा ठाकूर,पनवेल महापालिकेचे माजी महापौर कविता चौतमल, माजी नगराध्यक्षा चारुशीला घरात, खोपोली संपर्क प्रमुख सुनील घरात, विधानसभा संयोजक दिपक भेहरे, उरण माजी नगराध्यक्षा सायली म्हात्रे, जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत पुरी,ओसवाल,मृणाल खेडकर, खोपोली शहराध्यक्ष इंदरमल खंडेलवाल,सेक्रेटरी सुनील नांदे, हेमंत नांदे,अविनाश कोळी,अजय इंगुलकर, उपाध्यक्ष दिलीप पवार,मिडीया प्रमुख राहुल जाधव,गोपाळ बावस्कर,विकास खरपुडे यांंच्यासह नऊ मंडळाच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.यावेळी अनेक महिलांनी भाजप मध्ये प्रवेश केला तर गुणवंत व सामजिक कार्यात यशस्वी महिलांचा ही सन्मान वाघ यांच्या हस्ते करण्यात आले.जिल्हाध्यक्षा अश्विनी पाटील यांनी प्रास्ताविकात महिलांचे सुरू असलेले कामाची माहिती चित्रा वाघ यांना दिली.

प्रत्येक महिला सक्रिय होऊन महिलांनी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी व सर्वसामान्य जनतेला शासनाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी रायगडचे जिल्हाधिकारी यांना भेटले पाहिजे आपल्या सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य जनते पर्यत योजना पोहचविण्याचे काम महिलांनी करावे, राज्य सरकार आणी केंद्र सरकारच्या योजना 102 आहेत त्या जनते पर्यत पोचविण्यासाठी काम करा महिला आणि तरुणी ची काळजी करणारे आपल केंद्र आणि राज्य सरकार आहे महिला बचत गटासाठी प्रोडक्शनसह मार्केटिंग कशी करायचे यासाठी आगामी काळात बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याचे सांगत “थोडं थांबा गॅसचे भावही कमी होतील” असा शब्द वाघ यांनी महिलांना दिला.

प्रत्येकाच्या घरात शौचालय देण्याचे काम मोदी यांनी केले आहे. त्यामुळे हे भाजपाचे सरकार महिलांचा आदर करणारे सरकार असक्याने महिलांनी ही भाजपाच्या कार्य घराघरात पोहचविण्यासाठी सज्ज व्हा असा सल्ला या महिला मेळाव्यातून देत खोपोली भव्य असा महिलांचा मेळावा आयोजित केल्याबद्दल महिला जिल्हाध्यक्षा अश्विनी पाटील यांचे प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी कौतुक केले आहे.


हे ही वाचा –  ‘ती’ जखम आजही राज ठाकरेंच्या मनाला बोचतेय; नीलम गोऱ्हेंचं जहरी टीकास्त्र