Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रMaharashtra Election Result 2024 : लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान वाढले...ठरणार निर्णायक ?

Maharashtra Election Result 2024 : लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान वाढले…ठरणार निर्णायक ?

Subscribe

विधानसभेचे मतदान झाले आणि आता लवकरच निकाल हाती येणार आहेत. पण या निवडणुकीत एक लक्षणीय बाब समोर आली ती म्हणजे, लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभेला महिलांच्या मतदानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली.

मुंबई : विधानसभेचे मतदान झाले आणि आता लवकरच निकाल हाती येणार आहेत. पण या निवडणुकीत एक लक्षणीय बाब समोर आली ती म्हणजे, लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभेला महिलांच्या मतदानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. सरकारने गाजावाजा करत आणलेली लाडकी बहीण योजना, एसटी प्रवासात महिलांना दिलेली 50 टक्के सवलत याचा हा परिणाम असल्याचे मानले जात आहे. (womens voter turnout rises post ladki bahin scheme implementation)

या निवडणुकीत महायुती सरकारने मध्यप्रदेश पॅटर्न राबवत महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणली. या योजनेचा मध्यप्रदेशला निवडणुकीत चांगलाच फायदा झाला. आणि नंतरच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला पुन्हा सत्ता आणण्यात यश मिळाले. आता हाच फायदा महायुतीला या निवडणुकीत मिळतो का, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Election Results 2024 : मतमोजणीच्या पहिल्या दोन तासांत भाजपा आघाडीवर, महायुती बहुमताच्या दिशेने

आकडेवारीनुसार, लोकसभेला 2 कोटी 63 लाख 49 हजार 66 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला होता. हीच संख्या वाढून विधानसभेला 3 कोटी 6 लाख 49 हजार 319 महिलांनी मतदान केले. म्हणजेच 43 लाख 253 हजारांने महिलांचे मतदान वाढले. तर दुसरीकडे लोकसभेपेक्षा विधानसभेला पुरुष मतदार मात्र 27 लाख 80 हजारांनी वाढले. महिला मतदान वाढीत हिंगोली क्रमांक एकवर आहे. तेथे 26.84% मतदान वाढले.

- Advertisement -

महायुती सरकारने अगदी शेवटी शेवटी लाडकी बहीण योजना जारी केली. आणि तातडीने त्याचे पैसे जमा देखील करण्यात आले. आणि याचा अत्यंत प्रभावी प्रचार महायुतीतील तीनही पक्षांनी केला. त्याचाच हा परिणाम असल्याचे मानले जात आहे. निवडणूक आचारसंहिता लागू करण्यापूर्वीच चार महिन्यांचे पैसे सरकारने लाखो महिलांच्या बँक खात्यात जमा केले होते.

याअंतर्गत सुरुवातीला 1500 रुपये दिले जात होते. ते वाढवून आता 2100 करण्याचे आश्वासन महायुतीने दिले आहे. तर दुसरीकडे सरकारच्या या योजनेवर टीका करणाऱ्या महाविकास आघाडीने आपल्या जाहीरनाम्यात ही रक्कम 3 हजार रुपये करण्याचे आश्वासन दिले आहे.

हेही वाचा – Maharashtra Election Results 2024 : अरेच्चा, उमेदवाराचे डिपॉझिट जप्त; म्हणजे नेमके काय झाले?

महिलांचे मतदान वाढलेले जिल्हे

पुणे : 5,18,628
ठाणे : 3,20,519
नाशिक : 2,64,276
अहिल्यानगर : 2, 23,182
नागपूर : 2,03,061
जळगाव : 1,68,397
मुंबई उपनगर : 1,71,877


Edited by : Ashwini A. Bhatavdekar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -