घरदेश-विदेशमहाराष्ट्राला एकही इंच देणार नाही, सीमाप्रश्नी बोम्मईंनी पुन्हा डिवचलं

महाराष्ट्राला एकही इंच देणार नाही, सीमाप्रश्नी बोम्मईंनी पुन्हा डिवचलं

Subscribe

बेळगाव – सोलापूरमधील जत तालुक्यात पाणी प्रश्न गंभीर झाल्याने येथील काही गावं कर्नाटकात विलीन होण्यास तयार असल्याचा दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केला होता. त्यानंतर, दोन्ही राज्यांमध्ये सीमावादवरून वादंग निर्माण झाला आहे. दरम्यान, महापरिनिर्वाण दिनी महाराष्ट्रातील वाहनांवर कर्नाटकात हल्ला झाला. त्यामुळे सीमावाद आणखी विकोपाला पोहोचला आहे. याप्रकरणात आता केंद्र सरकार हस्तक्षेप करणार असून अमित शाहा लवकरच दोन्ही राज्यातील नेत्यांशी बोलणार आहे. मात्र, असं असतानाही बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्राला पुन्हा डिवचलं आहे.

कर्नाटक- महाराष्ट्र सीमावादावरून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्याशी बोलणे झाले आहे. कर्नाटक महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही. या प्रकरणात कोणतीही तडजोड करणार नाही. अमित शाहांबरोबर सीमाप्रश्नावरून कोणतीही चर्चा झाली नाही,” असं बोम्मईंनी ठामपणे सांगितलं.

- Advertisement -

महाराष्ट्रात असलेल्या कन्नडिगांचे संरक्षण करण्याबाबत सर्व खबरदारी घेण्यात आली आहे. याबाबत महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आणि मुख्य सचिव यांच्याशी चर्चा केली आहे. नड्डा यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना फोन करून शांतता राखण्यास सांगितलं आहे, असंही बोम्मई यांनी म्हटलं आहे.

कोल्हापुरात जमावबंदी

- Advertisement -

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रकरणी कोल्हापुरात पुढील १५ दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली असून आदेशाविरोधात जाणाऱ्यांवर कलम १४४ चा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. अप्पर जिल्हा दंडाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी हे आदेश जारी केले आहेत. या काळात मिरवणुका आणि सभांनाही मनाई करण्यात आली आहे.

हेही वाचा – सीमावाद : कोल्हापुरात जमावबंदीचे आदेश, खासदार भेटणार अमित शाहांना

महामोर्चाचे आयोजन

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसेच भाजपच्या अन्य नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज तसेच राज्याच्या इतर मानबिंदूंवर करण्यात आलेली अवमानकारक वक्तव्ये, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे महाराष्ट्रद्रोही विधान आणि
कर्नाटकविरोधात राज्य सरकारने घेतलेली नेभळट भूमिका, राज्यातील उद्योगधंदे गुजरातमध्ये नेण्याचे कट कारस्थान तसेच वाढती बेरोजगारी आणि महागाईच्या प्रश्नावर राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्यासाठी महाविकास आघाडीतर्फे येत्या १७ डिसेंबरला सकाळी ११ वाजता मुंबईत जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा अतिविराट महामोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार तसेच काँग्रेस विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. हा मोर्चाचा पहिला टप्पा आहे. यानंतरही सरकार ऐकणार नसेल तर टप्प्याटप्प्याने आंदोलन केले जाईल, असा इशारा महाविकास आघाडीने दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -