‘शिवस्मारकाच्या कामात झालेला भ्रष्टाचार बाहेर काढल्याशिवाय गप्प बसणार नाही’, नवाब मलिक

शिवस्मारक होणारच मात्र स्मारक कामात झालेला भ्रष्टाचार बाहेर काढल्याशिवाय गप्प बसणार नाही हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नवाब मलिक म्हणाले.

NCP Spokesperson Nawab Malik
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक

आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी शिवस्मारकाबाबत बोलताना नवाब मलिक यांनी विरोधी पक्षाचे चंद्रकांत पाटील यांना आव्हान दिले आहे.शिवस्मारक कामात भ्रष्टाचार झाला याचा पर्दाफाश केला आहे त्यामुळे हा मुद्दा लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहात मांडून भ्रष्टाचार बाहेर काढल्याशिवाय शांत बसणार नाही अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी आज नागपूर येथे माध्यमांशी बोलताना दिली.याप्रकरणी सरकारने चौकशी समिती स्थापन करावी आणि चौकशीत चंद्रकात पाटील यांनी भ्रष्टाचार केला आहे हे सिद्ध करुन दाखवणारच असे आमदार नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

‘मुंबई अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक व्हावे यासाठी आघाडी सरकारने जागा निश्चित केली होती. मात्र भाजपाचे सरकार आल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते जलपुजन करण्यात आले. परंतु अजूनही तिथे काम सुरु झालेले नाही. निविदा काढण्यात आली, फेर निविदा काढून पुन्हा ठेका देण्यात आला. त्याप्रक्रियेत फार मोठा भ्रष्टाचार झाला आहे. हे सार्वजनिक खात्यातील अधिकारी यांनी कॅगला कळवले होते. वरिष्ठ इंजिनिअर ऑर्डर द्यायला तयार नव्हते. शेवटी कनिष्ठ अधिकार्‍यांनी ती वर्कऑर्डर दिली होती. ही कागदपत्रे आहेत. मी आणि कॉंग्रेसचे सचिन सावंत यांनी दोनवेळा प्रेस घेवून जनतेसमोर आणले आहे’

– नवाब मलिक

कॅगने अहवाल दिल्यानंतर शिवस्मारकात भ्रष्टाचार होत असल्याचे सिद्ध होत आहे. चंद्रकात पाटील त्याकाळात मंत्री होते. त्यांनीच यात हात धुतला होता. ज्यावेळी नवाब मलिक यांनी प्रेस घेवून ट्वीट केले तेव्हा चंद्रकात पाटील यांनी याप्रकरणी खुलासा करावा अशी मागणी केली होती. भ्रष्टाचार केल्यामुळे चंद्रकात पाटील यांना खुलासा नीटपणे करता आला नाही. आज ते सांगत आहेत की स्मारकाचे काम थांबवण्यासाठी केलं जात आहे परंतु स्मारकाची कामेच सुरु झालेली नाही. स्मारक हे होणारच परंतु यांचा भ्रष्टाचार बाहेर काढल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असं देखील नवाब मलिक. लक्षवेधीच्या माध्यमातून हा प्रश्न सभागृहात मांडणार आहे. असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला.

काम सुरु न होताच ८० कोटी खर्च कसा?
स्मारकाची कामे अदयाप सुरुही झालेली नाहीत मात्र तरीही त्यावर पाटील यांच्या काळात ८० कोटींचा खर्च दाखवण्यात आला आहे असेही मलिक यांनी निदर्शनास आणून दिले. हा ८० कोटी खर्च नेमका कोठे झाला याची माहीती देण्याची मागणीही त्यांनी केली.


हेही वाचा: ‘सावरकरांच्या नावाचा उपयोग केवळ राजकीय पोळी भाजण्यासाठी’