Work From Home : गरोदर महिलांसह आजारी व्यक्तीला मिळणार ‘ही’ सुविधा

left side sleeping benefits
गरोदर

राज्यात सध्या कोरोनाचे संकट असून, दिवसेंदिव कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर मर्यादा घातली आहे तर दुसरीकडे गरोदर महिला कर्मचारी तसेच विविध आजारांवर उपचार घेत असलेल्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांनाही कार्यालयात उपस्थित राहण्यापासून सूट दिली आहे. मात्र त्यांना घरून काम करावे लागणार आहे.

रोटेशन काम करण्याची मुभा –

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांना रोटेशनने काम करण्याची मुभा दिली आहे. त्याचबरोबर गरोदर महिला आणि विविध आजारांवर उपचार घेणाऱ्यांनाही कार्यालयात उपस्थित राहण्यापासून सूट दिली आहे. गरोदर महिला, अवयव प्रत्यारोपण झालेले अधिकारी कर्मचारी तसेच केमो थेरेपी आणि इम्युनोसप्रेसिव्ह थेरेपी घेत असलेल्यांनाही सूट दिली आहे. मात्र त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. ज्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्यापासून सूट मिळाली आहे. त्यांनी महत्वाची शासकीय कामाचे मार्गी लागण्यासाठी त्यांचे व्हॉट्सअॅप मोबाईल क्रमांक, ई-मेल विभागप्रमुखांना सादर करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यामुळे घरी बसूनही शासकीय कामे मार्गी लावता येतील.

हेही वाचा –

कोरोनामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वाढदिवस साजरा करणार नाहीत