घरमहाराष्ट्रक्रशर मशीनमध्ये पडून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू

क्रशर मशीनमध्ये पडून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू

Subscribe

गणेश मशीनवर सफाईचे काम करत होते. अचानक त्यांचा तोल जाऊन ते मशीनवर पडले यातच त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

पालघरमध्ये दुर्दैवी घटना घडली आहे. एका कामगाराचा क्रशर मशीनमध्ये चिरडून मृत्यू झाला आहे. बोईसरजवळच्या गुंदले गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. आज सकाळी क्रशर मशीनजवळ काम करताना संजय गणेशकर या सफाई कामागाराचा तोल जाऊन तो मशीनमध्ये पडला. त्यावेळी मशीन सुरु होती. दरम्यान, या मशीनमध्ये चिरडून त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले. या दुर्देवी घटनेनंतर गुंदले गावात खळबळ उडाली आहे.

अशी घडली घटना

बोईसरजवळच्या गुंदले गावाच्या हद्दीमध्ये ‘लकी स्टोन’ क्रशर मशीनचे काम सुरु होते. लकी स्टोन क्रशर मशीनर संजय गणेशकर हे सफाईचे कामगार होते. नेहमीप्रमाणे या मशीनवर आज सकाळी कामाला सुरुवात झाली. दरम्यान, गणेश मशीनवर सफाईचे काम करत होते. अचानक त्यांचा तोल जाऊन ते मशीनवर पडले. मशीनच्या पट्ट्यात अडकून ते थेट दगडांचे तुकडे करणाऱ्या मशीनमध्ये गेले. त्यामध्ये त्यांच्या शरीराचे अक्षरश: बारीक बारीक तुकडे झाले. या दुर्देवी घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणाचा पोलिसांकडून कसून तपास सुरु आहे.

- Advertisement -

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे घडली घटना

पालघरच्या बोईसर परिसरामध्ये अनेक दगडखाणी आणि क्रशर मशीन चालवल्या जातात. नियमांचे उल्लंघन करत हा व्यवसाय या परिसरात मोठ्याप्रमाणात केला जातो. मात्र महसूल खाते आणि पोलिसांच्या आर्थिक व्यवहारामुळे या भागामध्ये मोठ्याप्रमाणात अधिकृत व्यवसाय चालतात असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. अशाप्रकारची घटना यापूर्वी देखील घडली होती. दोन दिवसांपूर्वी नागझरी गावाच्या हद्दीत मासे पकडण्यासाठी दगड खाणींसाठी वापरल्या जाणाऱ्या जिलेटीनचा स्फोट करताना एका तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ही दुसरी घटना घडली आहे. आतातरी प्रशासानाने याकडे लक्ष देऊन हे व्यवसाय बंद करावे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -