घर महाराष्ट्र पालिका कामगार कर्मचारी संघटना समन्वय समितीतर्फे कामगारांचा मोर्चा

पालिका कामगार कर्मचारी संघटना समन्वय समितीतर्फे कामगारांचा मोर्चा

Subscribe

सरकारी, निमसरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी संरक्षण कवच असलेले '३३२' व '३५३' कलम रद्द करू नये. पेन्शन व घरांची समस्या आदी मागण्यांसाठी मुंबई महापालिका कामगार कर्मचारी संघटना समन्वय समितीतर्फे अभियंते, कामगारांचा भव्य मोर्चा बुधवारी दुपारी २ वाजता आझाद मैदानात काढण्यात येणार आहे.

सरकारी, निमसरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी संरक्षण कवच असलेले ‘३३२’ व ‘३५३’ कलम रद्द करू नये. कोरोना संबंधित कामांत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून सदर कालावधीत जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांची चौकशीच्या नावाखाली सुरू असलेली छळवणूक, पिळवणूक थांबविण्यात यावी. पेन्शन व घरांची समस्या आदी मागण्यांसाठी मुंबई महापालिका कामगार कर्मचारी संघटना समन्वय समितीतर्फे अभियंते, कामगारांचा भव्य मोर्चा बुधवारी दुपारी २ वाजता आझाद मैदानात काढण्यात येणार आहे. (Workers march organized by Municipal Workers Union Coordinating Committee)

या मोर्चात महापालिकेचे विविध खात्यातील अधिकारी, अभियंते, शिक्षक, अग्निशमन दलाचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचारी, रुग्णालयातील नर्स, कर्मचारी आदी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

- Advertisement -

या मोर्चासाठी रणनीती आखण्यासाठी मंगळवारी दुपारच्या सुमारास महापालिका मुख्यालयातील कॅन्टीनमध्ये पालिकेतील विविध कामगार संघटनांचे अधिकारी, कर्मचारी व नेते यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत बुधवारी महापालिकेवर काढण्यात येणाऱ्या भव्य मोर्चाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

या मोर्चाचे नेतृत्व कामगार नेते अँड. महाबळ शेट्टी, बाबा कदम, सत्यवान जावकर, रमेश भुतेकर – देशमुख, वामन कविस्कर ,अशोक जाधव, अँड. प्रकाश देवदास बा. शि. साळवी, के.पी. नाईक, दिवाकर दळवी, साईनाथ राजाध्यक्ष, यशवंत धुरी, शरद सिंह, शेषराव राठोड, संजीवन पवार, आदी समन्वय समितीचे पदाधिकारी करणार आहेत. सदर मोर्चा पार पडल्यावर, कामगार संघटनांच्या मागण्यांचे निवेदन देण्यासाठी व सकारत्मक चर्चा करून तोडगा काढण्यासाठी कामगार नेत्यांचे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे.

- Advertisement -

( हेही वाचा: “…तर लायसन्स रदद करणार”; प्रशासनाच्या इशाऱ्याने कांदा प्रश्न अधिक चिघळणार? )

- Advertisment -