घरताज्या घडामोडीछत्रपती शिवाजी महाराजांवर सिनेमा आणतोय, सध्या काम सुरूय; राज ठाकरेंची मुलाखतीत घोषणा

छत्रपती शिवाजी महाराजांवर सिनेमा आणतोय, सध्या काम सुरूय; राज ठाकरेंची मुलाखतीत घोषणा

Subscribe

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे येत्या काळात लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांवर सिनेमा आणणार आहेत. याबाबत राज ठाकरे यांनी स्वत: घोषणा केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘हर हर महादेव’ या चित्रपटात आवाज दिला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे येत्या काळात लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांवर सिनेमा आणणार आहेत. याबाबत राज ठाकरे यांनी स्वत: घोषणा केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘हर हर महादेव’ या चित्रपटात आवाज दिला आहे. ‘हर हर महादेव’ हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित असलेला चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या पार्श्वभूमीर मराठी अभिनेते सुबोध भावे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. त्यावेळी राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरीव सिनेमाबाबत भाष्य केले. (working on chhatrapati shivaji maharaj movie says mns chief raj thackeray)

नेमके काय म्हणाले राज ठाकरे?

- Advertisement -

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील काही प्रसंग घेऊन त्यावरच सिनेमा करणे म्हणजे त्या माणसावर अन्याय करण्यासारखे आहे, असे मला वाटते. मग माझ्या मनात आले की टेलिव्हिजन सीरिअल करू, त्यासंदर्भात माझे आशुतोष गोवारीकर यांच्याशी बोलणे झाले. त्यावेळी तिथे नितीन चंद्रकांत देसाई होते. त्यांनी त्यात रस दाखवला आणि त्यांनी त्यावर काम सुरू केले. ती सीरिअल येऊनही खूप वर्ष झाली. आता सर्व प्लॅटफॉर्म बदलले आहे. सध्या माझे त्यावर काम सुरू आहे. आताच मी तुम्हाला कुणाकडे काम दिलेय वगैरे या सगळ्या गोष्टी सांगत नाही. पण दोन ते तीन भागांत छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट आणायचा माझा विचार सुरू आहे. आता त्याबद्दल सांगण्यासारखे काहीच नाही. ते झाले की सविस्तर बोलूच”, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

‘हर हर महादेव’ या चित्रपटात आवाज दिला आहे. याबाबत या मुलाखतीत राज ठाकरे यांनी प्रश्न विचारला असता, त्यांनी शिवरायांवर चित्रपट होता, म्हणून मी आवाज दिला, असे राज ठाकरे यांनी म्हटले. शिवाय, राज ठाकरे यांनी चित्रपटाशी संबंधित अनेक किस्से सांगितले.

- Advertisement -

शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित ‘हर हर महादेव’ चित्रपटात दिसणार आहे. सुबोध भावे शिवरायांच्या भूमिकेत असणार आहे, तर अभिनेता शरद केळकर बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेत आहे. या चित्रपटामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला आवाज दिला आहे.


हेही वाचा – शिवरायांचा चित्रपट म्हणून मी आवाज दिला; राज ठाकरेंचे वक्तव्य

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -