घरमहाराष्ट्रकुंभार उद्योगाला मिळणार जागतिक दर्जा

कुंभार उद्योगाला मिळणार जागतिक दर्जा

Subscribe

भद्रावती कुंभारी क्लस्टर प्रकल्पाला एक कोटी ८१ लाखांचे पॅकेज, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची माहिती

राज्यातील कुंभार उद्योगाला जागतिक दर्जा मिळवून देण्यासाठी कुंभारी क्लस्टर प्रकल्पासाठी एक कोटी ८१ लाखांचे पॅकेज देण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. भद्रावती येथे ग्रामोदय संघात आयोजित खादी, ग्रामोद्योग आयोग स्फूर्ती योजनांतर्गत कारागीर सशक्तीकरण चर्चा-प्रधानमंत्री रोजगार योजना जागृक अभियान चर्चासत्रात गडकरी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी, ‘मातीतून कलात्मक वस्तूंची निर्मिती करणाऱ्या कुंभार उद्योगाला पारंपारिक कलेतून आधुनिकतेकडे नेणाऱ्या भद्रावती येथील ग्रामोदय संघात कुंभार प्रशिक्षण कलेकरिता आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण व शोध संस्थान प्रकल्प उभारण्यात येणार आहे, हे एकमेव प्रशिक्षण केंद्र टेराकोटा (लालमाती) संशोधन केंद्र म्हणून जगात अव्वल ठरेल’, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केला.

गडकरी म्हणाले, या प्रकल्पाला तर्फे दहा कोटीचा निधी देण्यात येईल. यामुळे अनेकांना रोजगार मिळेल. ग्रामोदय संघात काही कारणामुळे वेळेप्रमाणे बदल झाले नाही. त्यामुळे संघाचा मोठ्या प्रमाणात विकास झाला नाही. पण कला जिवंत ठेवण्याचे काम ग्रामोदय संघाने असल्याचे त्यांनी ठळकपणे नमुद केले. यावेळी टेराकोटा पोटरी केंद्राची तसेच यातील योजनांची माहिती देण्यात आली. गडकरांनी संपूर्ण ग्रामोदय संघाची पाहणी करत चर्चा केली. स्पूर्ती योजनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या कुंभारी क्लस्टर प्रकल्प एक कोटी ८१ लाख रुपये खर्च करून उभारण्यात येत असल्याचेही यावेळी जाहीर केले. या कार्यक्रमाचे संचालन विजय श्रीवास्तव, प्रास्ताविक व आभार जितेंद्र कुमार यांनी मानले. याप्रसंगी खादी ग्रामोद्योग आयोगाचे पश्चिम क्षेत्र उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय हेडाऊ, एल. के. मिश्रा, व्ही. एस. लाडे, ग्रामोदय संघ भद्रावतीचे अध्यक्ष जितेंद्रकुमार उपस्थित होते.

- Advertisement -

१९५५ मध्ये कृष्णमुर्ती मिर मीरा यांनी भद्रावती येथे ग्रामोदय संघाची स्थापना केली. सात एकर असलेल्या या ग्रामोदय संघात आज या ठिकाणी प्रशिक्षण केंद्र, संशोधन कार्यक्रम, राखेपासून विटा तयार करणे, कौशल्य विकास प्रशिक्षणे होतात. ग्रामोदय संघात कुंभारी क्लस्टर प्रकल्प उभारल्या जात असून यासाठी २०१ कारागिरांची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्याभरातून तसेच राज्याच्या विविध भागातून या कार्यक्रमासाठी बरेच कारागीर आले होते.


हेही वाचा- २६ जानेवारीला प्लास्टिकचा ‘तिरंगा’ वापरू नका; गृह मंत्रालयाची नियमावली जाहीर
sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -