घरCORONA UPDATEआयआयटीने शोधल वर्ल्ड वाईड हेल्प

आयआयटीने शोधल वर्ल्ड वाईड हेल्प

Subscribe

आयआयटी मुंबईच्या कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरींगच्या विभागील विद्यार्थ्यांनी वर्ल्ड वाईड हेल्प हा प्लॅटफॉर्म तयार केला आहे.

जगभरातील करोनाचे वाढते संकट पाहता आता आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने लोकांची मदत करण्यासाठीचा पुढाकार घेतला आहे. आयआयटी मुंबईच्या कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरींगच्या विभागील विद्यार्थ्यांनी वर्ल्ड वाईड हेल्प हा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. त्यामुळे करोनाग्रस्त लोक या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आवश्यक असणारी मदत मागू शकतात. सीएससी विभागातील प्राध्यापक कामेश्वरी चेब्रोलु यांच्या नेतृत्वात हा प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे.

आरोग्याशी संबंधित मदत पोहचवणारे, तसेच वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स यांची मदत या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मिळणे शक्य होईल. त्यामुळे सध्या मदतकार्यातील डॉक्टर आणि हॉस्पिटल या दोन्ही यंत्रणांचा तसेच प्रोफेशनल्सचा ताण कमी होण्यासाठी मदत होईल. व्हर्च्युअल विनंतीच्या माध्यमातून करोनाग्रस्तांना यासाठीची मदत मिळवता येईल. फोन आणि वॉट्स एप या दोन्ही माध्यमांचा वापर करून या प्लॅटफॉर्मवर मदत मिळणे शक्य आहे. लॉकडाऊन आणि जीवनावश्यक गोष्टींवर मर्यादा आलेल्या स्थितीत हे प्लॅटफॉर्म दुर्गम भागातही मदत पोहचवण्यासाठी सक्षम आहे. सध्याच्या यंत्रणांमध्ये कॉल सेंटर किंवा टोल फ्री क्रमांकाच्या तुलनेत हा सर्वात स्वस्त आणि उपयुक्त असा पर्याय आहे.या प्लॅटफॉर्मवरून काय मदत देता येईल. १ हॉस्पिटलने या प्लॅटफॉर्मचा वापर केल्यास रूग्ण आणि हॉस्पिटल यांच्यात समन्वय होऊन, डॉक्टरांचा अनावश्यक प्रवास आणि संपर्क कमी करणे यामुळे शक्य होईल. २ सरकारमार्फत पुरवण्यात येणाऱ्या यंत्रणेत कोव्हिड १९ बाबतची माहिती पोहचवणे, सरकारी योजना किंवा पॅकेजची माहिती देणे, लॉकडाऊनमध्ये माहितीचा पुरवठा करणे यासारख्या गोष्टी उपयुक्त ठरतील. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेणेही यामुळे शक्य होईल.
३ करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वेक्षणावर आणि माहितीवर आधारीत यंत्रणेचा वापर करणे शक्य होईल..

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -