घरताज्या घडामोडीवरळी विधानसभा मतदारसंघात ठाकरे विरुद्ध ठाकरे होणार लढत; शिंदे गटाकडून तयारीला सुरुवात

वरळी विधानसभा मतदारसंघात ठाकरे विरुद्ध ठाकरे होणार लढत; शिंदे गटाकडून तयारीला सुरुवात

Subscribe

दक्षिण मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांना टक्कर देण्यासाठी शिंदे गटाने तयारीला सुरूवात केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षातर्फे आदित्य ठाकरे यांचे बंधू निहार ठाकरे यांना रिंगणात उतरवण्याची तयारी केली जात आहे.

दक्षिण मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांना टक्कर देण्यासाठी शिंदे गटाने तयारीला सुरूवात केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षातर्फे आदित्य ठाकरे यांचे बंधू निहार ठाकरे यांना रिंगणात उतरवण्याची तयारी केली जात आहे. त्यामुळे आगामी काळात वरळीत ठाकरे विरुद्ध ठाकरे लढत पाहायला मिळणार आहे. (worli assembly constituency eknath shinde faction nihar thackeray aditya thackeray challenge)

निहार ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे ज्येष्ठ पुत्र बिंदू माधव ठाकरे यांचे पुत्र आहेत. ते व्यवसायाने वकील असून, सध्या ते निवडणूक आयोगात ठाकरे गटाचे वकील आहेत. त्यामुळे आगामी काळात ठाकरे विरुद्ध ठाकरे यांच्यात लढत होऊ शकते. शिंदे गटाच्या वतीने निहार ठाकरे यांना वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाऊ शकते. याबाबत पक्षांतर्गत चर्चा सुरू आहे.

- Advertisement -

नुकताच ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वरळी विधानसभा मतदारसंघातून त्यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले आहे. वरळीचे आमदार ठाकरे यांनी शुक्रवारी पक्षाच्या एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केलेल्या शिवसेनेच्या इतर आमदार आणि खासदारांना राजीनामा देऊन मतदारांना नव्याने सामोरे जाण्याचे आव्हान दिले.

“मी या असंवैधानिक मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले आहे की, मी वरळीच्या आमदारपदाचा राजीनामा देईन आणि तुम्ही माझ्याविरुद्ध निवडणूक लढवा. बघू तुम्ही वरळीतून कसे जिंकता. मी या 13 पक्षांतरित खासदार आणि 40 आमदारांनाही आव्हान देत आहे की त्यांनी राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडणूक लढवावी आणि ते निवडून येतात का ते पाहणार आहे”, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

शिंदे गटाचा पलटवार

शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाण्यातून राजीनामा देऊन वरळीतून निवडणूक लढवण्याचे खुले आव्हान दिल्यानंतर महाराष्ट्राचे मंत्री आणि शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरेंचे हे वक्तव्य बालिश असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


हेही वाचा – मुंबईवर पुन्हा दहशतवादी हल्ल्याची धमकी; पोलीस यंत्रणा अलर्ट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -