भयंकर! स्मशानभूमीत अघोरी कृत्य; अल्पवयीन मुलीच्या मांडीवर कोंबडा ठेवून केली पूजा

प्रातिनिधीक फोटो

साताऱ्यातील सुरूर येथे अल्पवयीन मुलीसोबत स्मशानभूमीत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे आजू-बाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाई तालुक्यातील सुरूर गावाच्या स्मशानभूमीत हा धक्कादायक प्रकार घडलाय. स्मशानभूमीत हा आघोरी प्रकार करताना एका कट्ट्यावर एका मुलीच्या मांडीवर ‘कोंबडा’ ठेवून मांत्रिकाने पूजा केली. या धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यानंतर मांत्रिकासह अल्पवयीन मुलगी व नातेवाइक बेपत्ता झाले असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या प्रकारामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

असा घडला प्रकार

मांत्रिकाने या अल्पवयीन मुलीला सर्वात प्रथम वाईतील कृष्णा नदीत अंघोळ घालण्यास सांगितली. त्यानंतर तिचे नदीकाठी पूजन करण्यात आले आणि त्यानंतर मुलीला सुरूर येथील स्मशानभूमीत पुजा करण्यासाठी सांगितले गेले. ही मुलगी व तिचे नातेवाइक पुणे हडपसर येथून आलेली असून ते आता या मांत्रिकासह फरार झाले आहे. याबाबतचा अधिक तपास वाई पोलिसांकडून सुरू आहे.

सातारा या जिल्ह्यात बुवाबाजी, अंधश्रद्धेच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. या जिल्ह्यातील वाई तालुक्‍याला ऐतिहासिक परंपरा असल्याचे सांगितले जाते. पुण्याप्रमाणं वाई देखील शिक्षणाचं माहेरघर असून अशा सुसंस्कृत वाई तालुक्‍यात काही ठिकाणं अआजही लोक देवाला कौल लावतांना दिसतात. त्यापैकीच एक गाव म्हणजे ‘सुरूर’.


ईडी हे भाजपचं उपकार्यालय; अडसूळ यांच्यावरील कारवाईनंतर अरविंद सावंत यांचा हल्लाबोल