घरदेश-विदेश"सचिन तुम्ही मूग गिळून गप्प का?"; कुस्तीपटूंच्या आंदोलनावरून तेंडुलकरच्या घराबाहेर झळकले बॅनर

“सचिन तुम्ही मूग गिळून गप्प का?”; कुस्तीपटूंच्या आंदोलनावरून तेंडुलकरच्या घराबाहेर झळकले बॅनर

Subscribe

भारतरत्न सचिन तेंडुलकर याने कुस्तीपटूंच्या आंदोलन प्रकरणात चुप्पी साधल्याने आता अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. या प्रकरणाचे काही बॅनर आता सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर झळकलेले आहेत. "मत विरहित भारतरत्न सचिन तेंडुलकर जी भारताच्या अंतर्गत बाबीमध्ये तुम्ही मूग गिळून गप्प का???" असा प्रश्न या बॅनरच्या माध्यमातून विचारण्यात आला आहे.

गेल्या महिन्याभरापासून दिल्ली येथील जंतरमंतर मैदानावर भारतीय महिला कुस्तीपटूंकडून आंदोलन करण्यात येत आहे. भाजपचे बिहारचे खासदार बृजभूषण सिंह यांनी लैंगिक अत्याचार केला, असा आरोप या आंदोलक महिला कुस्तीपटूंकडून करण्यात आलेला आहे. त्यामुळे या प्रकरणी बृजभूषण सिंह यांच्यावर कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आलेली आहे. या प्रकरणी विविध स्तरांतील लोकांचा पाठिंबा या महिला कुस्तीपटूंना मिळत असला तरी भाजपचे केंद्रीय मंत्री किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या प्रकरणी अद्यापही एक अक्षर बोललेले नाहीत. त्याचबरोबर क्रिकेट या खेळातील देव असलेला आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर याने देखील या प्रकरणात चुप्पी साधल्याने आता अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. या प्रकरणाचे काही बॅनर आता सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर झळकलेले आहेत. “मत विरहित भारतरत्न सचिन तेंडुलकर जी भारताच्या अंतर्गत बाबीमध्ये तुम्ही मूग गिळून गप्प का???” असा प्रश्न या बॅनरच्या माध्यमातून विचारण्यात आला आहे. (Wrestlers’ agitation A banner was seen outside Sachin Tendulkar’s house)

हेही वाचा – राजीनाम्यापूर्वी डॉ. तात्याराव लहाने यांनी फडणवीस यांची भेट घेतली होती; माजी खासदाराचा दावा

- Advertisement -

मुंबई प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रवक्त्या रंजिता गोरे यांनी हे बॅनर लावलेले आहेत. रंजिता गोरे यांनी हे बॅनर सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर लावलेले आहेत. त्यांनी या बॅनर्सवर लिहिले आहे की, “मत विरहित भारतरत्न सचिन तेंडुलकरजी भारताच्या अंतर्गत बाबीमध्ये तुम्ही मूग गिळून गप्प का? शेतकरी आंदोलनावर बोलणाऱ्या परकीय महिला खेळाडूला तुम्ही सणसणीत उत्तर दिलं होतं. आमच्या देशांतर्गत प्रश्नात तू नाक खुपसू नकोस, असं सुनावलं होतं. आज मात्र सचिन तुझे तेच देश प्रेम कुठे गेले आहे?… सीबीआय… इन्कम टॅक्स, या सगळ्यांच्या धाडी पडतील म्हणून तु कुठल्यातरी दबावाखाली आहेस का??? क्रीडा विश्वातील तुम्ही देव माणूस आहात. एक भारतरत्न देखील आहात मात्र जेव्हा क्रीडा विश्वातील काही महिला लैंगिक अत्याचार विरोधात आवाज उठवत आहेत. तेव्हा मात्र आम्हाला तुमच्यातील माणूस आणि तुमच्यातील माणुसकी कोठेही दिसून येत नाही.” असे या बॅनरच्या माध्यमातून रंजिता गोरे यांनी उपस्थित केले आहेत.

- Advertisement -

हल्लीच, सचिन तेंडुलकरची राज्याच्या स्वच्छ मुख अभियानासाठी महाराष्ट्राचा ‘स्माइल अँबेसिडर’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी सचिनला टोला लगावला आहे. “आपले कुस्तीगीर न्याय मागत आहेत पण भाजपा त्यांच्या खासदाराला वाचवण्यासाठी कुस्तीगीरांच्या आंदोलनाकडे डोळेझाक करत आहे. जसा तू आमचा अभिमान आहेस, तशाच आपल्या देशातील महिला कुस्तीपटूही आमचा अभिमान आहेत. एक खेळाडू म्हणून तू तुझ्या बांधवांना पाठिंबा दिला पाहिजेस, हे आपलं कर्तव्य आहे. आम्हाला आशा आहे की, तू यावर बोलशील आणि आपल्या कुस्तीपटूंचा ‘स्माइल अँबेसिडर’ होशील.” असे म्हणत क्रास्टो यांनी ट्वीट केले होते.

दरम्यान, गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या आंदोलनावर मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक अक्षरी काढलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जगातील प्रभावी नेता म्हणून ओळखले जाते. पण या प्रकरणावर त्यांची असलेले चुप्पी मात्र अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित करत आहेत. एकीकडे ‘बेटी बचाव, बेटी पढाव’च्या घोषणा देण्यात येतात.. महिला सन्मानाच्या गोष्टी करण्यात येतात. पण गेल्या महिन्याभरापासून जंतरमंतरवर आंदोलनाला बसलेल्या कुस्तीपटूंना कोणीही न्याय देऊ शकलेले नाही. उलट या मुलींचे अनेकांकडून मनोबल खच्चीकरण करण्याचे काम करण्यात आले. त्यामुळे मोदींनी या प्रश्नी अद्यापही कोणतीही कारवाई का केलेली नाही? आज या कुस्तीपटूंनी आपले मेडल गंगेत वाहण्याचा निर्णय घेतला तरी सुद्धा मोदी नेमके शांत का? असा प्रश्न या निमित्ताने आता उपस्थित होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -