Homeताज्या घडामोडीWrestlers Crime Career : कुस्तीपटू गुन्हेगारीच्या आखाड्यात; भारतात घडल्या दोन घटना

Wrestlers Crime Career : कुस्तीपटू गुन्हेगारीच्या आखाड्यात; भारतात घडल्या दोन घटना

Subscribe

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या राहत्या घरी हल्ला करण्यात आला. चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या हल्लेखोराने सैफवर सहा वार केले. यामध्ये दोन वार गंभीर आहेत. हल्लेखोराने सैफच्या पाठीत चाकू भोसकला आणि हातावर मानेवर वार केले. यामध्ये सैफ गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर तात्काळ शस्त्रक्रियाही करावी लागली. मात्र सैफवर हल्ला करणारा आरोपी कुस्तीपटू होता, त्यामुळे सैफसोबत झालेल्या झटापटीत तो वरचढ ठरला.

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या राहत्या घरी हल्ला करण्यात आला. चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या हल्लेखोराने सैफवर सहा वार केले. यामध्ये दोन वार गंभीर आहेत. हल्लेखोराने सैफच्या पाठीत चाकू भोसकला आणि हातावर मानेवर वार केले. यामध्ये सैफ गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर तात्काळ शस्त्रक्रियाही करावी लागली. मात्र सैफवर हल्ला करणारा आरोपी कुस्तीपटू होता, त्यामुळे सैफसोबत झालेल्या झटापटीत तो वरचढ ठरला. मात्र, ही घटना घडली असली तरी याआधीही अशीच घटना भारतात घडली आहे. भारतीय कुस्तीपटू सुशील कुमार याला एका युवा कुस्तीपटूच्या मत्यूप्रकरणी अटक करण्यात आली. अशा दोन घटना भारतात घडल्यामुळे कुस्तीपटू आपल्या करिअरसाठी गुन्हेगारीच्या आखाड्यात उतरत आहेत का, असा सवाल उपस्थित झाला आहे. (Wrestlers in the arena of crime for a career Two incidents occurred in India Saif Ali Khan Attacked Case and Sushil Kumar Arrest Case)

करिअर हा प्रत्येकाच्या जीवनात महत्त्वाचा टप्पा असतो. कारण करिअरवर लक्ष केंद्रीत केल्यास जीवनात अनेक गोष्टी साध्य करता येतात. पण याच करिअरच्या चक्रव्युहात अनेकजण आजही अडकले आहेत. काहीजण करिअरच्या शोधात आहेत तर, काहीजण करिअरच्या नावे वेगळा मार्ग निवडत आहेत. अशा अनेक घटना भारतात घडल्या. त्यातील दोन महत्त्वाच्या घटना नुकताच घडली, ती म्हणजे बांगलादेशी कुस्तीपटूने अभिनेता सैफ अली खानवर हल्ला केल्याची घटना आणि काही वर्षांपूर्वी भारताचा कुस्तीपटू सुशील कुमार याने युवा खेळाडूला केलेली मारहाण… या दोन घटनांमुळे कुस्तीचा आरखडा सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.

बांगलादेशी कुस्तीपटूचा सैफवर हल्ला

मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद असं अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. रविवार 19 जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास पोलिसांनी सैफ अली खान याच्यावर हल्ला करणारा हल्लेखोर शहजाद याला अटक केली. ठाण्यातील लेबर कॅम्प परिसरातून आरोपीला अटक केली आली. त्यानंतर सध्या शहजादची अधिक चौकशी करण्यात आली. त्यावेळी आरोपी शहजाद हा बांगलादेशी नागरिक असून तो बांगलादेशात राष्ट्रीय आणि जिल्हास्तरीय पातळीवर कुस्ती खेळायचा, अशा माहिती समोर आली. परिणामी, शहजाद हा कुस्तीपटू असल्याने तो सैफसोबत झालेल्या झटापटीत वरचढ ठरला आणि पळ काढण्यात यशस्वी ठरला. मात्र, सध्या आरोपी शहजाद हा पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. सोमवारी रात्री पोलिसांनी आरोपीला सैफच्या घरी आणि संबंधीत घटनास्थळी नेऊन संपूर्ण घटनेचे नाट्यरुपांतर केले.

सुशील कुमारची युवा खेळाडूला मारहाण

दिल्लीमधील छत्रसाल स्टेडियमच्या बाहेरील परिसरात घटना घडली होती. सागर कुमार हा भारताचा एक युवा कुस्तीपटू नवी दिल्लीमध्ये सराव करत होता आणि त्यानंतर तो आपल्या भाड्याने घेतलेल्या घरी राहायला जात होता. हे भाड्याचे घर ऑलिम्पिक पदकविजेत्या सुशील कुमारचे होते. त्यावेळी सुशील कुमारने सागरला घर सोडून जाण्यास सांगितले होते. पण सागर ही रुम सोडण्यास तयार नव्हता. मात्र, सागरचा सराव संपला त्यानंतर स्डेडियमबाहेर सुशील कुमार सागरशी बोलण्याकरीता थांबला होता. त्यावेळी सुशील कुमारबरोबर काही अन्य व्यक्ती उपस्थित होते. त्यावेळी बातचीत सुरू असताना त्यांच्यात भांडणं झाली आणि त्यांनी सागरला मारहाण केली. या मारहाणीमध्ये सागर गंभीररीत्या जखमी झाला आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर सुशील कुमार फरार झाला होता. पोलिसांनी संपूर्ण घटनेचा तपास केला पण फरार सुशील कुमार सापडत नव्हता. परिणमी त्याला शोधण्यासाठी 50 हजार रुपयांचे इनाम पोलिसांनी ठेवले होते. मात्र पंजाबमधील जालंधर येथून सुशील कुमार याला दिल्ली पोलिसांनी अटक केली. असाच प्रकार सैफ हल्लाप्रकरणातही घडला. सैफवर हल्ला केल्यानंतर आरोपी फरार झाला होता. पोलिसांनी 35 तुकड्या तैनात करत आरोपीचा शोध घेतला. विविध ठिकाणी आरोपीचे फोटो लावले. त्यानंतर तीन दिवसांनी ठाण्यातील लेबर कॅम्प परिसरातून आरोपीला पोलिसांनी अटक केली.

मात्र या घटनांमुळे सध्या कुस्तीचा आखाडा चर्चेत आला आहे. करिअरसाठी या दोन्ही खेळाडूंनी गुन्हेगारीचा मार्ग निवडला. परिणामी अपेक्षित करिअर झाले नाही, परंतू आयुष्यभर कुस्तीसाठी घेतलेली मेहनत वाया घालावली.


हेही वाचा – कुस्तीपटू ते चोर, सैफवर हल्ला करणारा शहजाद कोण? बांगलादेशी कनेक्शन