सदाभाऊ खोतांचा जीव धोक्यात; केंद्र सरकारकडून Y दर्जाची सुरक्षा

हा प्रकार निषेधार्ह आहे. याप्रकरणी तक्रार दाखल केली असून पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. असं सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केले.

Y level security for sadabhau khot from central government
Y level security for sadabhau khot from central government

रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना केंद्रीय गृह मंत्रालयाने वाय दर्जाची सुरक्षा प्रदान केली आहे. गृह मंत्रालयाने यासंदर्भात मुंबई पोलीस आणि संबंधित सुरक्षा दलांना यासंदर्भातील आदेशाचे पत्र पाठवले आहे. त्यानुसार सदा भाऊ खोतांना रविवारपासून वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. सदाभाऊ खोत यांना गेल्या काही दिवसांपासून जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. त्यामुळे सदाभाऊ खोतांना आता वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. पुढील आढावा समितीची बैठक होईपर्यंत सदाभाऊ खोतांना वाय दर्जाची सुरक्षा लागू असेल, अशी माहिती पत्रात देण्यात आली आहे. (Y level security for sadabhau khot from central government)

केंद्र सरकारने राज्यातील भाजपच्या अनेक नेत्यांना विशेष सुरक्षा पुरवली आहे. सदाभाऊ खोत यांना पुरवण्यात येणाऱ्या वाय दर्जाच्या सुरक्षा पथकात एकूण ११ सुरक्षारक्षक असतील. यामध्ये एनएसजीचे एक किंवा दोन कमांडो आणि पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश असेल. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहखात्याने अपक्ष खासदार नवनीत रवी राणा यांनाही वाय प्लस दर्जाची सुरक्षा प्रदान केली होती.

काही दिवसांपूर्वी एका हॉटेल व्यावसायिकाची उधारी थकल्यामुळे त्याने सदाभाऊ खोत यांचा ताफा अडवल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. यावेळी सदाभाऊ खोत यांनी तो हॉटेल व्यावसायिक राष्ट्रवादीचा कार्यकर्त्या असल्याचा आरोप केला होता. ज्यामुळे आपला जीवाला धोका असल्याचा दावा केला होता. याबाबतची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाला कळवणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानुसार आता केंद्राने सदाभाऊ खोतांना वाय दर्जाची सुरक्षा पुरवली आहे.

केंद्र सरकारने राज्यातील भाजपच्या अनेक नेत्यांना आत्तापर्यंत वाय दर्जाची सुरक्षा प्रदान केली आहे. त्यानुसार आता सदाभाऊ खोत यांना सुरक्षा पथकात एकूण ११ सुरक्षारक्षक असतील. यात एनएसजीचे एक किंवा दोन कमांडो आणि पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश असेल, काही दिवसांपूर्वीच केंद्रीय गृह मंत्रालयाने अपक्ष खासदार नवनीत राणा यांना वाय दर्जाची सुरक्षा प्रदान केली आहे.

सदाभाऊ खोत काही दिवसांपूर्वी सोलापूर दौऱ्यावर होते, या दौऱ्यादरम्यान 2014 च्या लोकसभा निवडणुक काळातील ‘हॉटेलची उधारी द्या, मगच पुढं जावा’ असे म्हणत सांगोला येथील अशोक शिनगारे या हॉटेल मालकाने खोतांचा ताफा अडवला, याप्रकारामुळे सदाभाऊ खोत अस्वस्थ झाले होते. ज्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, पंचायतराज समितीच्या माध्यमातून सोलापूर दौऱ्यासाठी सांगोल्यामध्ये आलो होतो. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी माझा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. माझ्या अंगावर धावून येत मुद्दाम गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार निषेधार्ह आहे. याप्रकरणी तक्रार दाखल केली असून पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. असं त्यांनी स्पष्ट केले. यावेळी खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही अनेक आरोप केले आहे.

सदाभाऊ खोत म्हणाले की, पवार कुटुंबियांकडून मला धोका आहे, कारण ही माणसं कोणत्याही थराला जाऊ शकतात, पण माझा प्राण गेला तरी चालेल पण तुमची व्यवस्था आणि मस्तावालपणे लुटीच्या माध्यमातून उभारलेला चिरेबंदी वाडा पाडल्याशिवाय हा सदाभाऊ शांत बसणार नाही असा इशारा त्यांनी दिला होता.

ज्यावर प्रतिक्रिया देत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, राज्य सरकारनेही सदाभाऊ खोत यांच्या सुरक्षेत वाढ केली होती. सदाभाऊ खोत यांच्या जीवाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून धोका आहे, असे मला वाटत नाही. परंतु तरी सुद्धा त्यांनी जी भीती व्यक्त केलेली आहे. ती लक्षात घेता आणि त्यांचं जीवन सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून मी राज्याच्या पोलीस प्रमुखांना सूचना दिलेल्या आहेत.


नुपूर शर्मांना 6-7 महिन्यात मोठ्या नेत्या बनवले जाईल; ओवैसींनी भाजपावर साधला निशाणा